पुण्याचं नाव बदलून ‘जिजापूर’ करा... - संभाजी ब्रिगेडची मागणी
.jpg)
पुणे (कटूसत्य वृत्त):- पुणे शहराचं नाव बदलण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडने राज्य सरकारला पत्र पाठवून तातडीने पाऊल उचलण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील नाव लाखो शिवप्रेमींची ही मनापासून इच्छा आहे ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण करावी.
पुणे शहराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई म्हणजेच जिजाऊ माँसाहेब यांचा वारसा आहे. त्यामुळे पुण्याचं नाव बदलून ‘जिजापूर’ करावं, अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे.
जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवत हे शहर वसवलं आहे. पुणे आता ज्या स्थितीत आहे, ते फक्त जिजाऊंच्या योगदानामुळेच, हे कोणीही विसरणार नाही, असं संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ‘औरंगाबाद’चं नाव ‘संभाजीनगर’ आणि ‘उस्मानाबाद’चं नाव ‘धाराशीव’ करण्याच्या निर्णयाचे स्वागत व मागणीला पाठिंबा असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
- संतोष शिंदे, पुणे प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र 9850842703
0 Comments