Hot Posts

6/recent/ticker-posts

सह्याद्री फार्मसी कॉलेजच्या प्राध्यापिका नाझिया अशपाक तांबोळी यांना पीचडी पदवी प्राप्त

 सह्याद्री फार्मसी कॉलेजच्या प्राध्यापिका नाझिया अशपाक तांबोळी यांना पीचडी पदवी प्राप्त


सांगोला (कटूसत्य वृत्त):-  सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी मेथवडे या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका नाझिया अशपाक तांबोळी याना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर या विद्यापीठाने त्यांना औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रांतील त्यांच्या संशोधनास पीचडी पदवी देऊन सन्मानित केले.त्यांनी आपला "फायटोकेमिकल अँड फार्माकॉलॉजिकल स्क्रिनिंग ऑफ मिमोसा हँमाटा ( वाइल्ड )" हा शोधनिबंध सादर करून पीचडी पदवी प्राप्त केली.या त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांनी त्यांचा सत्कार करून उज्वल भविष्याच्या शुभेछया दिल्या. महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील, व सर्व शिक्षक शिक्षकेतर स्टाफ यांचे सहकार्य तसेच महाविद्यालयात उपलभद्ध असणारे अनुभवी प्राध्यापक,अद्यावत उपकरणे,सुसज्य ग्रंथालय,अत्याधुनिक प्रयोगशाळां व केमिकल्स यांची उपलब्धता,अभ्यासमय परिसर,वेळोवेळी महाविद्यालयाने आयोजित केलेले वर्कशॉप,सेमिनार,गेस्ट लेक्चर,कॉन्फरन्स यामुळे हे यश प्राप्त होण्यास खूप मदत झाली असे त्या म्हणाल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments