टेंभुर्णी ग्रामपंचायतीची होणार नगरपंचायत
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गट व गणांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नगरविकास विभागाने टेंभुर्णी (ता. माढा) ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. टेंभुर्णी नगरपंचायतीसाठी प्राथमिक अधिसूचना आज नगरविकास विभागाने जाहीर केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सातवी नगरपंचायत टेंभुर्णीच्या माध्यमातून आता असित्वात येणार आहे.
टेंभुर्णी नगरपंचायत स्थापनेबाबत कोणाला हरकती व आक्षेप असल्यास त्यांनी अधिसूचना राज्य शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांमध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी आक्षेप असे आवाहन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी माढा, माळशिरस, अनगर, वैराग, श्रीपूर-महाळुंग व नातेपुते या पाच ठिकाणी नगरपंचायत अस्त्विात आली आहे. माढा तालुक्यात यापूर्वी कुर्डूवाडी नगरपरिषद व माढा नगरपंचायत अशा दोन नागरी संस्था कार्यरत आहेत. आता टेंभुर्णी नगरपंचायतीच्या माध्यमातून तिसरी नागरी स्थानिक स्वराज्य संस्था अस्त्विात येणार आहे.
No comments:
Post a Comment