रुग्णवाढीमुळे निर्बंध अटळ! एक कोटी व्यक्ती लसीविना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 6, 2022

रुग्णवाढीमुळे निर्बंध अटळ! एक कोटी व्यक्ती लसीविना

रुग्णवाढीमुळे निर्बंध अटळ! एक कोटी व्यक्ती लसीविना

               सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदर, वसई-विरार, पनवेल, पुणे व रायगड शहरांमध्ये कोरोनाचा वेग पुन्हा वाढू लागला आहे. तीन लाटा येऊन गेल्यानंतरही राज्यातील एक कोटी नऊ लाख व्यक्तींनी अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाही. तर पावणेतीन कोटी व्यक्तींनी अजूनही दुसरा डोस घेतलेला नाही. त्यात १२ ते १८ वयोगटातील सर्वाधिक तरूण अससल्याची बाब समोर आली आहे. त्यांना सात दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून कोरोनाला रोखण्यासाठी संबंधित शहरांमध्ये कडक निर्बंध लागू केले जाणार आहेत.

               कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नागरिकांनी ना मास्क वापरला ना लस घेतली. राज्यातील सोलापूर, औरंगाबाद, अमरावती, नगर, उस्मानाबाद, वाशिम, जालना, यवतमाळ, लातूर, बुलडाणा, परभणी, धुळे, अकोला, हिंगोली, नांदेड, बीड, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये अजूनही ३० ते ४८ टक्के व्यक्तींनी दुसरा डोस घेतलेला नाही. तसेच १२ ते १४ वयोगटातील १७ लाख, १५ ते १८ वयोगटातील २१ लाख तरूणांनी आणि १८ वर्षांवरील ७० लाख व्यक्तींनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. दुसरीकडे अडीच कोटी व्यक्ती दुसऱ्या डोससाठी आलेच नाहीत. कोरोना व्हायरस हा सातत्याने नवनवीन स्वरूपात येत असून लस न घेतलेल्यांना त्याचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे आता गर्दीच्या ठिकाणी सर्वांना मास्क सक्ती, गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध लागू हेातील. परजिल्ह्यात प्रवास करणाऱ्यांना दोन्ही डोस, बुस्टर डोस बंधनकारक केला जाऊ शकतो, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

८० टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे

               राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या साडेपाच हजारांपर्यंत आली आहे. तत्पूर्वी, मागील चार दिवसांत राज्यात तीन हजार ९७१ रुग्ण वाढले आहेत. त्यांच्यात कोरोनाच्या नवीन व्हायरसची लक्षणे आढळली आहेत. पण, त्यातील ८० टक्के रुग्णांवर घरीच उपचार सुरु असून रुग्णालयातील बहुतेक रुग्णांना तीव्र स्वरुपाच लक्षणे नाहीत, अशी माहिती राज्याचे आरोग्य संचालक डॉ. नितीन आंबाडेकर यांनी दिली. लसीकरणामुळे रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढणार नाही, यादृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचेही ते म्हणाले.

लसीकरणाची सद्यस्थिती :-

एकूण टार्गेट - १०,१४,१७,०००
पहिला डोस घेतला - ९,०५,१६,५५६
दोन्ही डोस घेतला - ७,३५,५२,०४५
एकही डोस घेतला नाही - १,०९,००,४४४
दुसरा डोस न घेतलेले - २,७८,६४,९५५

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages