मोहोळ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोठ्या उत्साहात साजरी

मोहोळ (कटूसत्य वृत्त) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ तालुका मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या मिरवणुकीने शहरातील वातावरण दुमदुमून निघाले.
शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती कार्यालयापासून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीचे उद्घाटन पुणे येथील धनगर समाज युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष घनश्याम हाके यांच्या हस्ते करण्यात आले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिमनदादा अण्णासाहेब डांगे हे होते .तर व्यासपीठावर धनगर समाजाचे नेते सुरेश कांबळे, विश्वनाथ वाघमोडे फरांदे महाराज ,जय हिंद सेनेचे संस्थापक संग्रामसिंह देवकते पाटील ,विठ्ठल बिरू देवाचे पुजारी पांडूदेव वाघमोडे,मनोहर(भाऊ)डोंगरे, पोपटराव देशमुख ,लहू लेंगरे, आकाश कोळेकर ,माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर , भाजपाचे ज्येष्ठ नेते पद्माकर देशमुख, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख काकासाहेब देशमुख, शहरप्रमुख विक्रम देशमुख, मनसेचे शहराध्यक्ष शाहू देशमुख ,अनिकेत पिसे, शालीन कोळेकर, बाळासाहेब बंडगर, संजिव खिलारे आदी उपस्थित होते.
उन्हामध्ये काढलेल्या या मिरवणुकीमध्ये घोड्यासह उंठावर हातात तलवार घेऊन सजलेल्या बाल अहिल्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. या मिरवणुकीमध्ये कोल्हापूर बार्शी सांगली कर्नाटक पंढरपूर पुणे परिसरातून मागविण्यात आलेले वेगवेगळ्या प्रकारचे गजे ढोल मागविण्यात आले होते . या पांरपारीक वाद्यांनी शहर दुमदुमून निघाले होते.
ही मिरवणूक यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव मंडळाचे आयोजक,रामचंद्र खांडेकर, गणेश(दादा)गावडे, बिरुदेव देवकते अध्यक्ष आनंद वाघमोडे,माधव देशमुख,अतुल गावडे,चंद्रकांत बरकडे ,संजय पडवळकर,रवी खरात,बाळू खरात ,नागेश मोटे ,संतोष वाघ, आबासाहेब बरकडे,दिलीप शामराव पाटील ,उमेश गोफणे,नागेश गाडे, भाऊसाहेब मोटे, यशवंत गावडे,श्रीकांत गाढवे,लक्ष्मण करे,संतोष सोलंकर,धुळूदेव माने, नितीन गरंडे,विनोद दुधाळ, अमोल पाटील,राघव घोडके,गणेश टेळे,मंगेश पांढरे,दिनेश वाघमोडे,नितीन सोनटक्के,दिलीप शिंदे,शंकर अरबळकर,यादव गावडे, अविनाश वाघमोडे, सोमनाथ दाईगडे, आनंद कोळेकर, गणेश धोकटे, सदाशिव होनमाने, अरुण गोफणे, तायापा सलगर, रवि मासाळ, गोपी पाटील, रावसाहेब चोरमले,शंकर बरकडे, श्रीरंग माने व महिला भगिनी साखरबाई बरकडे,प्राजक्ता अरबळकर,रोहिणी गावडे,सुचिता ईवले/व्हनकळसे,शौर्या गावडे, कोमल मोटे,साक्षी गाडे, कोळेकर, खरात, वाघमोडे,मिरा गावडे,लक्ष्मीबाई मोटे महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मिरवणुक पार पाडण्यासाठी गणेश गावडे,बिरूदेव देवकते याच्या सह मोहोळ तालुका सकल धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment