मोहोळच्या संजय गांधी निराधार समितीची पाचवी सभा आज संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 28, 2022

मोहोळच्या संजय गांधी निराधार समितीची पाचवी सभा आज संपन्न

 मोहोळच्या संजय गांधी निराधार समितीची पाचवी सभा आज संपन्न


मोहोळ(कटूसत्य वृत्त):- आज मोहोळ येथे संजय गांधी निराधार योजना समिती सदस्याची पाचवी बैठकसचिव तथा मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे -पाटील यांच्या दालनात आज समितीचे अध्यक्ष सज्जन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
      यामध्ये संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी श्रावणबाळ योजना. बाळ सेवा योजना गट अ व गट ब यांच्या एकूण 177 प्रकरनांना मंजुरी देण्यात आली.

यावेळी अध्यक्ष सज्जन पाटील समितीचे सदस्य याप्रसंगी प्रशांत बचुटे यशोदाताई कांबळे बाळासाहेब वाघमोडे संतोष चव्हाण आगलावे मुकुंद पाटील रफिक पाटील संजय देशमुख आदी सदस्य तर तहसीलदार लीना खरात मॅडम सह कार्यालयीन प्रमुख माननीय बंडगर व सवलदे उपस्थित होते.

संजय गांधी निराधार समिती योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया ही अत्यंत साधी सोपी असून लाभार्थ्यांनी कोणत्याही दलालांशी अथवा मध्यस्थाची संपर्क करू नये. त्या त्या गावातील तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून पात्र लाभार्थ्यांनी आपले अर्ज महा-ई-सेवा केंद्रातून दाखल करावेत. अर्ज दाखल करताना कोणत्याही प्रकारचे अडचण असल्यास तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना कार्यालयाशी संपर्क साधा.

प्रशांत बेडसे पाटील

तहसीलदार मोहोळ

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages