लघुशंकेच्या वादामुळे भावंडांवर कोयत्याने वार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 3, 2022

लघुशंकेच्या वादामुळे भावंडांवर कोयत्याने वार

लघुशंकेच्या वादामुळे भावंडांवर कोयत्याने वार

              लोणी काळभोर (कटुसत्य वृत्त): गोदामासमोर लघुशंका करण्यास विरोध केल्याच्या रागातून टोळक्याने दोघा भावंडांना मारहाण करून त्यांच्यावर कोयत्याने वार केला. ही घटना 31 मे रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास उरळी देवाची परिसरातील श्रीरामनगरमध्ये घडली.

              नौफिल फारूख मेमन याच्यासह इतर पाच ते सहाजणांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कासिम पाला (वय 29 रा. उंड्री) आणि हुसेन सिहाब पाला (वय 27)अशी जखमींची नावे आहेत.

              उरळी देवाची परिसरातील श्रीरामनगरमध्ये गोदामासमोर एकजण लघुशंका करीत होता. त्यावेळी कासिमने त्यांना लघुशंका करण्यास मनाई केली. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने 31 मे रोजी संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास कासिम आणि त्यांचे भाउ हुसेन काम करीत असलेल्या त्यांना गोदामात गाठले. कासिम यांना शिवीगाळ करून कोयत्याने वार केला.

              त्यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या हुसेनवरही वार करून जखमी केले. पोलिसांकडे तक्रार दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages