सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस संघटना भक्कम : कविता म्हेत्रे

घरोघरी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पोहचविण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
सांगोला (कटूसत्य वृत्त):-सांगोला तालुका आणि संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष जयमलाताई गायकवाड या दोघा बहीण-भावांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पक्ष संघटनेचे काम प्रगतिपथावर आहे. इतरांच्या तुलनेत सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस संघटना भक्कम आहे असा विश्वास राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कविता म्हेत्रे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी महिलांना सर्वच क्षेत्रात समान अधिकार दिले आहेत महिलांच्या न्याय हक्कासाठी घरोघरी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा विचार पोहोचविण्याच्या सूचना यावेळी कविता म्हेत्रे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष जयमलाताई गायकवाड, सांगोला पंचायत समितीच्या मा उपसभापती शोभा खटकाळे, रंजना हजारे, शुभांगी पाटील, मंगल खाडे, चैत्रजा बनकर, प्राजक्ता पाटील, शशिकला खाडे, सुजाता कांबळे, जयश्री पाटील, रंजना हरीहर, सुनिता तोरणे, सोनाली हाके, सुवर्णा काशीद, अर्चना शिंदे, संगीता पाखरे, शकुंतला खडतरे, जयश्री सावंत, रोहिणी चोरमुले, हसीना मुलानी, आदींसह पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.
पुढे बोलताना कविता म्हेत्रे म्हणाल्या आगामी वर्षभराच्या काळात नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत या निवडणुकीत महिलांना 50 टक्के आरक्षण असल्याने आपल्या संघटनेतून ज्या महिला पक्षाचे काम पक्षाचे विचार धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवतील अशा सक्रिय महिलांचा निवडणुकीसाठी पक्ष निश्चित विचार करेल त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आत्तापासूनच पक्ष संघटना बळकट करण्यासाठी व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार घरोघरी पोहचविण्यासाठी महिलांनी सज्ज रहावे असेही शेवटी म्हेत्रे म्हणाल्या.
राष्ट्रवादी महिला चळवळ काँग्रेसची चळवळ आणखी सशक्त करणार..!
सांगोला शहर आणि तालुक्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आपले काम प्रभावीपणे पार पाडत आहेत आगामी काळात पक्ष संघटनेच्या कामाबरोबरच महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सशक्त बनविण्यासाठी त्यांना उद्योग व्यवसायाच्या संधी घेऊन राष्ट्रवादी महिला काँग्रेसची चळवळ आणखी भक्कम व सशक्त करण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून आपले कार्य सुरू आहे ही चळवळ अधिक वेगाने व व्यापक प्रमाणात पुढील काळात सुरू ठेवणार;जयमालाताई गायकवाड,प्रदेश उपाध्यक्षा राष्ट्रवादी महिला काँग्रेस.
0 Comments