Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला बहुत विकास सोसायटीवर महाविकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व

 सांगोला बहुत विकास सोसायटीवर महाविकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व

१२ जागा बिनविरोध,  तर एका जागेवर महाविकास आघाडीचा मोठा विजय

सांगोला  (कटूसत्य वृत्त):- संपूर्ण सांगोला शहर आणि परिसराचे लक्ष लागून राहिलेली सांगोला बृहत विकास सोसायटीवर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व शेतकरी कामगार पक्ष प्रणित महाविकास आघाडीने आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे. १३ पैकी १२ जागा पूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या, परंतु एका जागेसाठी निवडणूक लागल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार फिरोज खतीब यांनी विरोधी अपक्ष उमेदवार महालिंग पाटणे यांच्यावर एकतर्फी विजय मिळवला.

सांगोला बृहत विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आघाडीतील सर्व नेते मंडळींनी प्रयत्न केले होते त्यांच्या प्रयत्नांना बहुतांशी यशही आले परंतु इतर मागासवर्गीय प्रवर्गातील एका जागेसाठी महालिंग पाटणे यांनी आपला अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार फिरोज खातीब आणि महालिंग पाटणे यांच्यात निवडणूक लागली होती या जागेवर फिरोज खतीब यांनी तब्बल २५० हून अधिक मतांनी एकतर्फी विजय मिळवला.

तत्पूर्वी सर्वसाधारण प्रवर्गातून सुभाष कृष्णदेव पाटील, सुखदेव आनंदा जांगळे, शांताराम साधू सुरवसे, बाळू आनंदा गावडे, भारत बाळासो गायकवाड, प्रभाकर शंकर घोंगडे, सुनिल गंगाराम पाटील, शिवाजी सावंत व शिवाजी निवृत्ती नरूटे हे उमेदवार तर महिला प्रवर्गातून मंगल खाडे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून किशोर बनसोडे हे १२ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर इतर मागासवर्गीय प्रवर्गातून लागलेली निवडणूक महाविकास आघाडीचे फिरोज खतीब यांनी जिंकली.

दरम्यान एकमेव जागेवर लागलेल्या निवडणुकीत महाविकस आघाडीच्या उमेदवाराने मोठा विजय संपादित केल्यानंतर सांगोला शहर परिसरात फिरोज खतीब तसेच महाविकास आघाडीच्या समर्थकांनी गुलाल उधळून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

Reactions

Post a Comment

0 Comments