Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरस्काराने समाजातील व्यक्तिंना प्रेरणा मिळते-माजी आ.धनाजीराव साठे,रोटरीच्या व्यवसाय सेवा पुरस्काराचे थाटात वितरण

 पुरस्काराने समाजातील व्यक्तिंना प्रेरणा मिळते-माजी आ.धनाजीराव साठे,रोटरीच्या व्यवसाय सेवा पुरस्काराचे थाटात वितरण 

माढा  (कटूसत्य वृत्त):-पुरस्काराने केवळ सन्मानच केला जातो असं नाही तर समाजातील व्यक्तिंना प्रेरणा आणि त्या पुरस्कारार्थी व्यक्तिस पुढील कामास  प्रोत्साहन मिळते.सामाजिक बांधिलकीचा वसा रोटरी ही आंतराष्ट्रीय संस्था सक्षमपणे पुढे नेत आहे.असे मत काँग्रेसचे माजी आ.धनाजीराव साठे यांनी व्यक्त केले.माढा रोटरी क्लबच्या व्यवसाय सेवा पुरस्काराचे वितरण माजी आमदार धनाजीराव साठे,नगराध्यक्षा अॅड मीनल साठे,ता.प.सदस्य धनराज शिंदे,प्रभारी सपोनि शाम बुवा यांच्या प्रमुख  उपस्थितीत पार पडला.

प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व वृक्षांना पाणी घालुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.रोटरीचे अध्यक्ष सचिन घाडगे व सचिव बंडु पवार यांनी वर्षभरात राबविलेल्या उपक्रमांची माहिती मनोगतातून दिली.माढा वेल्फेअर फौंडेशन चे अध्यक्ष धनराज शिंदे म्हणाले,माढा तालुका सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे.रोटरी क्लब ही आंतराष्ट्रीय संस्था असुन ग्रामीण भागातील जन सामान्यांपर्यंत संस्थेचे काम पोहचले आहे.नगराध्यक्षा अॅड.मिनल साठे,सपोनि किरण घोंगडे यांनी मनोगत व्यक्त केले.मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह,सन्मानपत्र देऊन  गौरविण्यात  आले तसेच त्यांच्या कार्याची चित्रफित यावेळी दाखविण्यात आली.

नगराध्यक्षा अॅड.मिनल साठे,स.पो.नि किरण घोंगडे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी माढा  रोटरीचे संस्थापक डाॅ.सोमेश्वर टोंगळे,उपप्रांतपाल डाॅ.सुभाष पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हनुमंत पाडुळे,नगरसेविका सुनिता राऊत,शबाना बागवान,गितांजली देशमुख,शिवाजी जगदाळे,प्रमोद वेदपाठक,डाॅ.विनोद शहा,दत्ताजी शिंदे,नागनाथ घाडगे,डाॅ.राजकुमार आडकर,आदीसह रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.रमेश कदम यांनी सुत्रसंचलन तर आभार बंडू पवार यांनी मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments