कदमवाक वस्ती मध्ये सापडला 20 किलो गांजा.विक्री करणाऱ्या दोघांना केले अटक....!

लोणी काळभोर (अनिकेत मुळीक):- २६/०६/२०२२ रोजी पुणे सोलापूर महामार्गावर ग्रामपंचायत कदमवाक वस्ती हद्दीत तब्बल २० किलो गांजाची विक्री साठी निघालेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथक १ च्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या जवळील सुमारे ४ लाख ७८ हजार ६०० रुपयांचा किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि घटना शनिवार दि.२५ सव्वा आठ सुमारास घडली आहे.
कु.अनिल नितळे (वय ३०, रा.लोणी स्टेशन,कदमवाक वस्ती ता.हवेली), ऋषिकेश रमेश बेले (वय -२४, रा.मु पो इंदिरानगर नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. उस्मााबाद असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी पांडुरंग सुभाष पवार (वय - ४५, अंमली पदार्थ विरोधी पथक १,गुन्हे शाखा,पुणे शहर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पुणे - सोलापूर महामार्गवर शनिवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास सोलापूर बाजूने जाणाऱ्या कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एच.पी पेट्रोल पंपाच्या समोर सार्वजनिक ठिकाणी दुचाकीवर कु. नितळे व मागे बसलेला ऋषिकेश बेले यांच्या ताब्यात ४ लाख ३ हजार ६०० रुपयांचे गांजा,१ दुचाकी,१५ हजार रुपयांचा एक मोबाईल असा ४ लाख ७८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बेकायेशीररित्या गांजा जवळ बाळगल्याचा मिळून आल्याने वरील दोन्ही आरोपींचा विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एन. डी.पी.एस,ॲक्ट कलम ८(क) २० (ब)(ii)(क)२९ नुसार कायदेशीर फिर्याद आहे.पुढील तपास चालू आहे.
0 Comments