माढ्यात हिंदु मुस्लिम एकतेचं घडतंय दर्शन,हिंदु व्यक्ति करतोय... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 3, 2022

माढ्यात हिंदु मुस्लिम एकतेचं घडतंय दर्शन,हिंदु व्यक्ति करतोय...

माढ्यात हिंदु मुस्लिम एकतेचं घडतंय दर्शन,हिंदु व्यक्ति करतोय  

गेल्या ९ वर्षापासुन गालिशा बाबा दर्ग्याचा ऊरूस साजरा,तलवारीच्या मिरवणुकीत सादर  झालेल्या कसरती ठरलं आकर्षण 

             माढा (कटुसत्य वृत्त): राज्यभरात हिंदु मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी अनेक राजकीय डावपेच  टीकास्त्र होत आहेत.मात्र अश्यातच सोलापूर च्या माढा शहरात पिंटू चवरे हा  हिंदु व्यक्ति गेल्या ९ वर्षापासुन गालिशा बाबा दर्ग्याचा ऊरूस साजरा करुन हिंदु मुस्लिम एकतेचा संदेश देण्याचे काम करताहेत.

             या उत्सवाची सुरुवात शहरातील ग्रामवेशीपासुन पारंपरिक पध्दतीने होते.शहरातुन वाजत गाजत संदल दर्ग्याची ख्याती १७ व्या शतकात उत्तर व पश्चिम भारता पर्यंत सर्व दुर पसरली होती.शहरातील मध्ययुगीन संत गालिशाबाबाची ख्याती  तेलंगणा,कर्नाटक,केरळ पर्यत पोहचली.वाजत गाजत मिरवणुक शहरातुन दर्ग्यावर आणण्यात आली.तलवार,सुई चा वापर करुन चित्तथरारक कसरती मिरवणुकीत सादर करण्यात आल्या.शहरवासियांसाठी मुख्य आकर्षण ठरले.दर्ग्याच्या परिसर   आकर्षक  विद्युत रोषणाईने देखील  नटला होता तर दर्शनासाठी आलेल्या  हिंदु मुस्लिम बांधवाना अन्नदान देखील चवरे यांनी केलंय.पिंटु चवरे परिवाराने  कृतीतुन  दाखवलेले  हिंदु मुस्लिम ऐक्याचे दर्शन राज्यातील इतर गावांपुढे अनुकरणीय आणी आदर्शदायी असंच आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages