प्रशासनाला हाताशी धरून वाळू तस्करांकडून तांडोर येथे अवैध वाळू उपसा सुरु

घोड़ेश्वर (कटूसत्य वृत्त):- मंगळवेढा तालुक्यातील तांडोर येथील भीमा नदी पात्रातून अवैध वाळू माफीयांकडून भीमा नदी पात्रातून अवैधरित्या प्रशासनाला हाताशी धरून रोज किमान शंभर टिपर अवैध वाळू उपसा पोकलेनच्या साह्याने प्रशासनाला धरून सुरू केलेला आहे. या अवैध वाळू उपस्यामुळे प्रशासनाचा दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडत असून हा वाळू उपसा मंगळवेढा प्रांतअधिकारी, तहसीलदार पोलिस स्टेशन या सर्वांच्या संगनमताने सदरचा पॉईंट सुरू आहे. या अवैध वाळू उपशाबाबत मा.शरद कोळी यानी तलाठी,तहसीलदार व प्रांताधिकारी यांना कळविले असता त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही ,उलट प्रशासनास का कळविले म्हणून संबंधित माफिया जीवे मारण्याची धमकी देत आहेत. सदर वाळू उपसा करणार्या अंडरवर्ल्ड गुंड रवींद्र काळे त्याचे सहकारी सुरेश काळे संजय शरणाप्पा भोसले अमित शर्मा भोसले अकोला विकास भोसले विकास भीमसेन भोसले शनिया भीमसेन भोसले किशोर उर्फ किसनराव भोसले संदीप भोसले मयूर भोसले सर भोसले व त्यांचे 40 ते 50 नातेवाईक मेरे यार बडे वडापूर तसेच लातूर उस्मानाबाद कंटक या राज्यातून त्यांच्यावर हाफ मर्डर मर्डर कोणी हल्ले मोठ्या दरोडे चोरी अशा सराईत गुंड सध्या या ठिकाणी एकत्र येऊन विविध हत्यारे वापरून त्या ठिकाणी वाळू उपसा मोठ्या प्रमाणात करीत आहेत. विशेष बाब म्हणजे वाळूमाफिया रवींद्र काळे हा सध्या मोक्याच्या कायद्यातून जामिनावर बाहेर आला आहे आणि तो जामिनावर बाहेर येऊन समाजामध्ये प्रचंड प्रमाणात दहशत माजवत असुन भीमा नदी पात्रातुन तांडोर येथून तो मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करीत आहे. वाळू उपशाबाबत मा.शरद कोळी यानी रीतसर तक्रार केली तरीही मंगळवेढा तालुक्यातील प्रांतअधिकारी, तहसिलदार व पोलीस डिपारमेंट कोणत्या ही पद्धतीची कारवाई करत नाहीत, उलट शरद कोळी सतत येथिल अवैध वाळू उपस्याबाबत पाठपुरावा करतो म्हणून जीवे मारण्याची धमकी संबंधित या सर्व गुंडाकडून येत आहेत. येथिल प्रचंड वाळू उपशामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची शक्यता नाकारता येत नसून महसूल ही मोठ्या प्रमाणात बुडत आहे. नाविलाजाने कोणी अधिकारी कारवाई करत नसल्यामुळे या सर्व लोकांविरुद्ध व अधिकार्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सदरचा अवैद्य वाळू पॉइंट अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे व संबंधित गुंडांनी माझ्यावर राग धरून जिवे मारण्याचा प्रयत्नही पाठीमागे केलेला होता तरी माननीय जिल्हाधिकारी यांना विनंती आहे की या संदर्भात लक्ष घालून आपण अवैध वाळू उपसा व पर्यावरणाचे होणारे नुकसान तसेच शासनाचा महसूल बुडणार असून या सर्व गोष्टीचा विचार करून त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी व मि सतत अवैध वाळू उपस्याबाबत पर्यावरणाचा होनारा र्ह्यास, प्रशासनाचा बुडनारा महसुल या बाबत आवाज उठवत असुन माझ्या संरक्षणात वाढ करावी अशी विनंती एका निवेदनाद्वारे धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिले आहे. यात सदर वाळू उपसा करनारे गुंड रविंद्र काळे, त्यांचे सहकारी सुरेश काळे,संजय शरणाप्पा भोसले,अमित शर्मा भोसले,अकोला विकास भोसले,विकास भीमसेन भोसले,शनिया भीमसेन भोसले, किसनराव भोसले,संदीप भोसले,मयूर भोसले व त्यांचे 40 ते 50 सहकारी यांच्या कडून जीवितास धोका असल्याचे शरद कोळी म्हटले आहे.
0 Comments