लोणी काळभोर गावकरी संत तुकाराम पालखी सोहळ्या साठी सज्ज

लोणी (कटूसत्य वृत्त):- लोणी काळभोर प्रतिनिधि अनिकेत मुळीक - संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे शुक्रवार दि.२४/०६/२०२२ लोणी काळभोर आगमन होणार असुन वारकऱ्यांच्या स्वागत व सेवेसाठी लोणी काळभोर गावकरी मंडळी तसेच वारकरी संप्रदाय . व प्रमुख नेते मंडळी यंत्रणा सज्ज झाली आहे.पालखी मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत अडथळा येऊ नये यासाठी अतिक्रमणे आणि रस्ता दुभाजकांमधील व रस्त्याच्या कडेने वाढलेली रोपटी, गवत काढण्यात येत आहे. सोमवारी अतिक्रमण विभागामार्फत पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढण्यात आली. विशेषत: पदपथ मोकळे करण्यात आले.
पालखी मार्गात आवश्यक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे नळकोंडाळे उभारण्यात आले आहेत. आवश्यक ठिकाणी टँकरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी मार्ग, मुक्काम, निर्गमन कालावधीत २४ तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पालिकेचा एक टँकर संपूर्ण पालखी मार्गावर पालखीसोबत राहणार आहे.अग्निशमन दलातर्फे आळंदी ते पंढरपूर मार्गावर एक अग्निशमन वाहन कर्मचाऱ्यांसह सहभागी असेल. पालखी मार्गावरील व मुक्काम, प्रस्थान कालावधीत सर्व ठिकाणी विद्युत व्यवस्था, मुक्कामाच्या ठिकाणी 'सीसीटीव्ही' कॅमेरे; तसेच लोणी काळभोर पोलीस स्टेशन बसवणार आहेत.वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसह आवश्यक औषधे व सामग्रीने सज्ज स्वतंत्र रुग्णवाहिका आळंदी ते पंढरपूर या मार्गावर पालखीसोबत असणार आहे. मुक्काम आणि प्रस्थान कालावधीमध्ये लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य दवाखान्यांमधून औषधोपचार सुविधांचेही नियोजन करण्यात आले.
0 Comments