शिक्षकांची बदल्या बाबत प्रतिक्षा संपली; बदलीच्या पोर्टलचे ९ जुन रोजी होणार उद्घाटन

इतरांचा हस्तक्षेप नाही शिक्षकांमध्ये आनंदी वातावरण
बेंबळे (कटूसत्य वृत्त):- गेल्या दोन वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या आँनलाईन प्रणाली द्वारे करण्यात येणार आहेत. सदर प्रणालीचे अनावरण आज गुरुवार दि. ९ जुन रोजी मंत्रालयात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या आँनलाईन शिक्षक बदली प्रणालीच्या अनावरण कार्यक्रमास ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास सचिव, सर्व विभागीय आयुक्त, आयुष प्रसाद., अध्यक्ष,जिल्हा परिषद शिक्षक बदली अभ्यासगट, संचालक माहिती व तंत्रज्ञान संचालनालय, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय हे उपस्थित राहणार आहेत.
शिक्षक सहकार संघटनेने आँनलाईन बदली संदर्भात ग्रामविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, शिक्षक सहकार संघटनेच्या शिष्टमंडळाला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व ग्रामविकास सचिव राजेशकुमार यांनी ९ जुनला बदली पोर्टल चे उद्घाटन करुन ३० जुन पर्यंत बदली प्रक्रिया पुर्ण करण्याचे आश्वासन ६ जूनला दिले होते. ते पुर्ण झाल्याने ग्रामविकास मंत्री व ग्रामविकास सचिव यांचे शिक्षक सहकार संघटना व शिक्षकांच्या वतीने आम्ही आभार मानतो असे शिक्षक सहकार संघटनेने राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड व राज्य सरचिटणीस निलेश देशमुख यांनी सांगितले.एकूणच यंदाची बदली प्रक्रिया ऑनलाइन पार पडणार आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांना घरबसल्या ऑनलाइन बदली आदेश मिळू शकणार आहेत.इतर कोणताही हस्तक्षेप होणार नसल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
No comments:
Post a Comment