उसप्रश्नावर राजकारण करणाऱ्यांचा बंदोबस्त केला जाईल... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 8, 2022

उसप्रश्नावर राजकारण करणाऱ्यांचा बंदोबस्त केला जाईल...

उसप्रश्नावर राजकारण करणाऱ्यांचा बंदोबस्त केला जाईल...

लागणनोंदीचा तक्ता प्रत्येक गावात बोर्डवर लावणार - आमदार बबनदादा शिंदे

                बेंबळे (कटुसत्य वृत्त): माढा तालुक्यातील काही अतिशिष्ट कार्यकर्ते व संचालक उस प्रश्नावरून शेतकऱ्याला वेठीस धरुन मते मिळवण्यासाठी खालच्या पातळीवरचे राजकारण करतात असे काही गावात दिसून आले आहे ,परंतु यापुढे गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या उसाच्या लागण नोंदीची फाईल मी स्वतःकडे ठेवणार आहे व कारखान्याच्या हार्वेस्टिंग (ऊस तोडणी) प्रोग्रँम प्रमाणेच प्रत्येक शेतकऱ्याला ऊसतोड मिळेल व नियमाप्रमाणे ऊस गळीतासाठी आणला जाईल. तसेच यापुढे ऊस लागवड नोंदीचे तक्ते गावोगावी ग्रामपंचायत बोर्डावर व गट ऑफिस मधून लावले जातील. काही ठिकाणी उसाची लागण ,ऊस नोंदणी ,ऊस तोडणी वाहतुकीसाठी ट्रँक्टर्स लावणे, ऊस बिलातून कपाती इत्यादी सर्व बाबी मिळवून देण्यासाठी काही संचालक व कार्यकर्ते शेतकऱ्याला भेट देऊन धमक्या देऊन मताचा जोगवा मागण्याचे कारस्थान करत आहेत,परंतु त्यांच्या अशा कृत्याला यापुढे चाप तर बसेलच पण त्यांना आम्ही पाठीशी घालणार नाही तेव्हा कोणीही काळजी करून किंवा घाबरून जाऊ नये असे प्रतिपादन विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी बेंबळे येथील नागरिकांशी बोलताना केले आहे.

                याबाबत सविस्तर वृत्त असे की बेंबळे ग्रा.प.च्या नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेल्या राजश्री समाधान भोसले यांचे प्रतिनिधी समाधान भोसले व तसेच इतर काही कार्यकर्ते निवडणूक जिंकल्याच्या आनंदात आपल्या नेत्याचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून आमदार बबनदादा शिंदे यांच्या भेटीस गेले होते, त्याप्रसंगी आमदार शिंदे यांनी स्पष्ट शब्दात बोलून सर्वांना धीर दिला .या पोटनिवडणुकीत कारखान्याचे संचालक विष्णू हुंबे यांच्या सुनबाई रेश्मा सागर हुंबे तब्बल 89 मतांनी पराभूत झाल्या. निवडणुक प्रचारादरम्यान विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यांचे संचालक विष्णू हुंबे यांनी मते मिळवण्यासाठी आमदार बबनदादा शिंदे यांच्या नावाचा गैरवापर केला. मतदारांना मते मागताना उस प्रश्नावरून धमक्या दिल्या, कांही जणांना मते न दिल्यास बघून घेतो अशी भाषा वापरली, तर कांही ठिकाणी आ.बबन दादांनी जे सहकार्य केले किंवा मदत केली ती माझ्यामुळेच , त्यामुळे मलाच मते द्यावी लागतील अशी मग्रुरीची भाषा पण वापरली, मला मते द्या अन्यथा ऊस जागेवर जाळून टाकीन अशी धमकीची भाषा वापरली व त्यांच्या असल्या अरेरावी वृत्तीमुळेच त्यांचा मतदारांनी 89 मतांनी पराभव केला ही वस्तुस्थिती निवडणुकीतील विजयानंतर आशीर्वाद घेण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांनी दादांच्या पुढे स्पष्ट सांगितली त्यामुळे आमदार शिंदे म्हणाले की तुम्हाला काहीही अडचणी येणार नाहीत, मी सगळा बंदोबस्त करतो, उसा बाबत राजकारण खपवून घेणार नसल्याचे बबनदादांनी सांगितले. याप्रसंगी विजयी उमेदवार प्रतिनिधी समाधान भोसले संभाजी भगत दादा मालक कैलास भोसले गोरख अनपट शिवाजी भोसले हर्षल भोसले सागर भोसले दीपक किर्ते भारत कोळी दादा भोसले विकास किर्ते सत्यवान भोसले सिद्धेश्वर शिंदे रवी भोसले शहाजी भोसले माणिक कोकाटे दत्ता जगताप, गळगुंडे,पोमा भोसले खंडू कांबळे सर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी आमदार शिंदे यांचा समाधान भोसले कैलास भोसले व दादा मालक यांनी सत्कार केला तर बबनदादांनीही समाधान भोसले यांचा सत्कार करून त्यांना भावी कारकीर्दीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages