ऑक्सिजन टाकीचा स्फोट होवून पाच लाखांचे नुकसान, जीवितहानी नाही
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एस. टी. बसस्थानक चौक ते निराळे वस्ती जाणाऱ्या रस्त्यावरील वेल्डिंगच्या दुकानात आज पहाटे ऑक्सिजन टाकीचा स्फोट होवून आग लागली. यात आजूबाजूची तीन दुकानही जळून खाक झाली आहे. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसून आर्थिक नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, निराळे वस्ती रस्त्यावर नाल्यालगत काही वेल्डिंगची तसेच मोबाईल शॉपी दुकानं आहेत. वेल्डिंग दुकानात रात्री २.३० च्या सुमारास आग लागली. यावेळी 1 ऑक्सिजन टाकीचा स्फोट होवून मोठा आवाज झाला. काही वेळातच हे दुकान आणि बाजूची तीन दुकानं जळाली. यात वाहनं रिपेअरी, मोबाईल रिपेअरी याचीही दुकानं होतं. जवळपास ५ लाख रुपयांच नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या भागातील नागरिकांनी तसेच पोलीस आणि अग्निशमन दलानं वेळीच खबरदारी घेवून आगीवर नियंत्रण मिळविलं. यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
No comments:
Post a Comment