शिवणे बीट मध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, June 12, 2022

शिवणे बीट मध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट

शिवणे बीट मध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट

कर्तव्यात चुकारपणा करणाऱ्याची कधी होणार उचलबांगडी ?

                सोलापूर (कटुसत्य वृत्त): सांगोला तालुक्यातील शिवणे बीट मध्ये पोलिसांच्या वरद हस्ताने जोमात अवैध धंदे सुरू आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील आणि पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी अवैध धंद्या विरोधात कडक मोहिमा करत असताना या बीट मधील पोलीस मात्र कारवाई करण्यात टाळाटाळ करीत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

                शिवणे बीट मध्ये शिरभावी,धायटी, चिंचोली, एखतपुर, मांजरी, संगेवाडी आदी गावाचा समावेश होतो. सांगोला पोलीस स्टेशन अंकित असलेल्या शिवणे बीट मधील गावात अवैध धंदे मात्र जोमात सुरू आहेत.त्यामुळे तरुण पिढी या धंद्याच्या नादी लागून बरबाद होत असल्याचे चित्र वरील गावात दिसून येत आहे.या बीट मधील पोलीस मात्र बघ्याच्या भूमिकेत असून डोळ्यावर झापड लावून आहेत.पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी हे मात्र आपले कर्तव्य पार पाडताना अवैध धदे बंद करण्यासाठी वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत आहे.

                हे अवैध धंदे बंद करून या बीट मधील गावात शांतत्ता आणि सुव्यवस्था अबाधित ठेण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा,अशी नागरिकांची अपेक्षा आहे. सांगोला ते महुद या महामार्गावरील अनेक धाब्यावर खुलेआम अवैध दारू विक्री होत आहे. पोलीस मात्र या धंद्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत. बीट मधील एखाद्या गावातील तक्रार आली की तक्रारकर्त्या नागरिकांना तक्रार मिटवून घेण्यासाठी आर्थिकतेचा भार सहन करावा लागत असल्याने बीट मधील पोलिसांची बदली करण्याची मागणी अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यानी बोलून दाखविली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages