Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी कॉग्रेस महाविकास आघाडी सोबत आहोत - अजित पवार

 राष्ट्रवादी कॉग्रेस महाविकास आघाडी सोबत आहोत - अजित पवार

मुंबई (नचिकेत पानसरे):- राज्यात सध्या राजकीय भुकंप घडवून आणलेला आहे या सर्व घडामोडीत जो पर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत तो पर्यंत आमचा त्यांना आमचा पाठिंबा आहे. आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत.असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

शिवसेनेचे काही आमदार तिकडे सुरत गुजरात मधून आसाम मधील गोहाटी मध्ये गेलेत त्यातील काही दोन आमदार परत आलेत.आणखी काही परत येतील. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले तसेच त्यांच्या नेत्यांनीही केले आहे त्यामुळे वाट पहावी लागेल परंतू आम्ही मविआ म्हणून सोबत आहोत.आमच्या मित्र पक्षाचे नेत्यांनी निधी वाटपा बाबत जो आरोप केला तो जर वेळीच सर्व घटक पक्षाच्या बैठकीत विचारणा केली तर योग्य ते सांगता आला असता असे सांगून त्यांनी आपण निधी वाटपात कोणताही दुजाभाव केलेला नाही. या सर्व घडामोडी मात्र भाजपा कुठेही आम्हाला दिसत नाही.ते समोर आले तर बोलता येईल.मात्र सुरत मध्ये कोणी सोय केली.कोणी  बस, विमानांची सोय केली ते समोर आल्यावर बोलता येईल. मात्र जो पर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत तो पर्यंत आमचा त्यांना पाठिंबा आहे आम्ही त्यांच्या सोबत आहोत. असे जयंत पाटील म्हणाले.

Reactions

Post a Comment

0 Comments