ऊस उत्पादकांच्या पाठबळावर यंदाही लोकनेते गाळपात बाजी मारणार चेअरमन बाळराजे पाटील यांचा विश्वास

कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन संपन्न
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-मोहोळ तालुक्यातील अनगर येथील लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याचा सन २०२२-२०२३ गळीत हंगामाचा मिल रोलर पुजन कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे कर्मचारी सी.एन देशमुख यांच्या शुभहस्ते दिमाखात करण्यात आले.मोहोळ तालुक्यातील अनगर येथील लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखाना हा शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळखला जातो. गाळप हंगाम २०२२-२३ साठी कारखान्याच्या शेती विभागामार्फत नुकतेच ऊस तोडणी वाहनांचे वाहतूक करारास सुरवात करण्यात आली होती. दरम्यान दि.२३ जून रोजी कारखान्याचा सन २०२२-२०२३ गळीत हंगामाचा मिल रोलर पुजन कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे कर्मचारी सी.एन देशमुख यांच्या शुभहस्ते दिमाखात करण्यात आले.
यावेळी बोलताना बाळराजे पाटील म्हणाले की, मोहोळसह पंढरपूर, बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरत कारखान्याचे कामकाज सुरू असुन इतर साखर कारखान्याच्या तुलनेत कारखाना ऊस उत्पादक शेतकर्यांना सर्व सोयी देत असुन कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे पाठबळावर आपण प्रत्येक हंगामात शेतकरी सभादांचा ऊस वेळेत गाळप करीत आहोत. गतवर्षीच्या तुलनेत यंदाही मोठ्या प्रमाणात ऊसाची उपलब्धता असुन नोंद दिलेल्या सर्व ऊस उत्पादक शेतकर्यांचा ऊस गाळपासाठी आणला जाणार असल्याचेही लोकनेते शुगर चे चेअरमन बाळराजे पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, लक्ष्मण मुखेकर, मुख्य शेती अधिकारी एम.आय.देशमुख, के.डी.वैद्य, संजय खुडे, संजय कासार, मदने, राजशेखर गायकवाड, नेताजी बोडके, सोमनाथ म्हेत्रे, अनंत उरणे, अनिल पवार, हनुमंत पासले, अजित बोडके आदी उपस्थित होते.
0 Comments