गुवाहटीतून त्या बंडखोर आमदाराने सांगितले शिंदे फडणवीस सरकार स्थापन करणार

मुंबई (नचिकेत पानसरे):- गुवाहटीत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झालेल्या एका आमदाराने फडणवीस शिंदे सरकार स्थापन करणार असे आपल्या मतदार संघातील एका कार्यकर्त्याशी बोलताना सांगितले.याबाबत त्यांची एक व्हिडिओ व्हायरल झाली. यामध्ये सर्व आमदारांना उद्देशून बोलताना आपल्या मागे एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा आणि महाशक्तीचा हात असल्याचे सांगत आहेत. दरम्यान (भाजप) अन् शिंदे यांचा सत्तास्थापनेचा प्लॅन गुवाहटीला शिंदे यांच्या गोटात असलेले सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजी पाटील यांनी फोडला आहे. याबाबतची त्यांची कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.
या कथित ऑडिओ क्लिपमध्ये शहाजी पाटील हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अन् एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार असल्याचे सांगत आहेत. शिवाय शिंदे यांच्या गटाला मंत्रिपदांची चांगली संख्या मिळणार असल्याचेही आमदार पाटील या व्हायरल क्लिपमध्ये सांगत आहेत. तसेच हे सरकार सत्तेत आल्यानंतर सांगोला मतदारसंघात ऐतिहासिक विकास होणार असल्याचा दावा शहाजी पाटीय या क्लिपमध्ये करत आहेत.
संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये संवाद साधत असलेला व्यक्ती शहाजी पाटील यांना या गोष्टी कधी घडणार असा सवाल विचारत आहेत. यावर बोलताना ते म्हणतात, साहेब निर्णय घेणार,साहेबांच्या मनावर. पण एक सांगतो,सरकार १०० टक्के झालं, फडणवसी साहेब मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री. चांगली संख्या मंत्रिपदाची एकनाथ शिंदे साहेब यांच्या गटाला मिळणार. त्यावर संबंधित व्यक्ती शहाजी पाटील यांना आपल्याला काय मिळणार? असा सवाल विचारत आहेत.
या प्रश्नावर उत्तर देताना शहाजी पाटील म्हणतात आपल्याला काय दिलं दिलं, नाय तर नाय. फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणजे आपणच मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री आहे की ओ. आता फडणवीस साहेब आणि माझं संबंध तुम्हाला नात माहित आहे. भावा-भावा सारखं आपलं नातं आहे. तर शिंदे साहेब मला मुलासारखे मानतात. मुलाच्या नरजेने माझ्याकडे बघतात, असेही शहाजी पाटील म्हणतं आहेत. पाटील यांच्या या क्लिपमधील दावे खरे ठरल्यास आगामी काळात ठाकरे सरकार जावून पुन्हा फडणवीस सरकार येणार हे निश्चित आहे.
0 Comments