श्रीसंत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याची निवडणुक प्रकिया उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेर दिवस - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 10, 2022

श्रीसंत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याची निवडणुक प्रकिया उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेर दिवस

श्रीसंत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याची निवडणुक प्रकिया  उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेर दिवस

अखेर माजी आ.धनाजीराव साठे यांचेसह  १७ जणांचे अर्ज दाखल

                 माढा (कटुसत्य वृत्त): स्वर्गीय विलासराव देशमुख व माजी आ.धनाजीराव साठे यांच्या मैत्रीचं प्रतिक असलेल्या माढा तालुक्यातील पडसाळी येथील श्रीसंत कुर्मदास साखर कारखान्याच्या  निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या गुरुवारी अखेरच्या  दिवशी १७ संचालकाच्या जागेसाठी १७ उमेदवारांचेच अर्ज दाखल झाले आहेत.

                 त्यामुळे श्रीसंत कुर्मदास सहकारी  साखर कारखान्याची निवडणुक बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाली असुन अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी उरली असुन सर्व प्रकिया पुर्ण झाल्यावरच प्रशासनाकडून घोषणा केली जाईल.काँग्रेसचे माजी आमदार तथा कारखान्याचे विद्यमान चेअरमन धनाजीराव साठे यांनी ही  उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी ज्योती कदम  यांच्याकडे सादर केला.यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण,नायब तहसीलदार आर.आर.कदम,उपनिबंधक श्री.लेंडवे,बि.डी.पाटील आदी उपस्थित होते.तसेच मंगळवारी  दिवसभरात एकुण १७ जणांनी  उमेदवारी अर्ज दाखल केलेत.१० जुन  ला  दाखल  अर्जाची छाननी तर १३ जुन ते २७ जुन या कालावधित अर्ज माघार घेण्याची अखेरची  मुदत आहे.

                 १७ जणांनी दाखल केलेले  उमेदवारी अर्ज -माजी आ.अॅड. धनाजीराव गणपतराव  साठे,गणपतराव साठे,विजयसिंह शिरीषकुमार पाटील,

                 राहुल विश्वास पाटील,शालिनी रोहिदास कदम,संध्याराणी धनाजी खरात,बाळासाहेब रंगनाथ पाटील,भालचंद्र देविदास पाटील,सयाजी माणिकराव पाटील,मधुकर विठ्ठ्ल चव्हाण,नारायण जोतिराम गायकवाड,सुधीर पाडुरंग पाटील,शशिकांत रामचंद्र देशमुख,हरिदास पाडुरंग खताळ,सिराज महिबुब शेख,शंकर अरुण नाईकवाडे,विठ्ठल रामलिंग शिंदे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages