Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णी येथे बंडखोर आमदारांना पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे तानाजी सावंत व माढा विधानसभा लढलेले संजय कोकाटे यांचे नाव काढून शिवसेनेच्या वतीने निषेध

 टेंभुर्णी येथे बंडखोर आमदारांना पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे तानाजी सावंत व माढा विधानसभा लढलेले संजय कोकाटे यांचे नाव काढून शिवसेनेच्या वतीने निषेध

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी शहरात शिवसेनेच्या वतीने आज सकाळी दहा वाजता बंडखोर आमदारांना पाठिंबा दिल्या मुळे शिवसेनेचे तानाजी सावंत व माढा विधानसभा लढलेले संजय कोकाटे यांचे नाव जाहीर निषेध करत फलकावरून काढण्यात आले.गत सहा दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व असे सत्ता नाट्य घडत आहे. याच सत्ता नाट्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेपासून दूर गेलेल्या एकनाथ शिंदे व इतर आमदारांचा निषेध टेंभुर्णी येथे शिवसेनेच्या वतीने करण्यात आला तसेच यावेळी माढा तालुक्यातील सर्व शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठामपणे शिवसेना वाढवण्याचे काम करणार असल्याचे तालुकाप्रमुख मधुकर देशमुख यांनी सांगितले. यावेळी बोलताना शिवसेनेचे शहरप्रमुख सुरेश लोंढे म्हणाले की असे ५६ आमदार गेले तरी पुन्हा नव्याने १५६ आमदार निवडून आणण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे.

यावेळी कुर्डुवाडी चौक या ठिकाणी असलेल्या फलकावरील शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख व भूम परंडा चे आमदार तानाजी सावंत व माढा तालुका शिवसेनेचे नेते संजय कोकाटे यांच्या नावाला काळी चिकटपट्टी लावून निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, शहर प्रमुख सुरेश लोंढे, शहर उपप्रमुख प्रशांत सोनवणे, संतोष खैरमोडे, शहर संघटक दादासाहेब कोळपे, माजी शहरप्रमुख चंद्रकांत कोठावळे, बेंबळे विभाग प्रमुख सोमनाथ लांडे, युवा सेना शहर समन्वयक किशोर देशमुख, युवा सेना शहर  उपयुवाअधिकारी जीवन राऊत, सुरज जाधव, शहर सचिव रवींद्र राऊत, शहर उपसचिव विजय पाटील, रमेश देशमुख, बाळासाहेब पोतदार, फिरोज तांबोळी, अण्णा पवार, गणेश नाळे, विकास लांडे, साहिल ताबे, शुभम कानडे, ओम स्वामी, विक्रम सावंत, गोविंद खैरमोडे, धनाजी कारंडे, संदीप लोंढे, किशोर पोळ, विकी जगताप, बाबा जगताप, प्रदिप जगताप, शंभू फुगे, माऊली मिसाळ, सोमनाथ गोडगे, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments