Hot Posts

6/recent/ticker-posts

कुर्डूवाडीत शिवसेना व युवा सेनेच्या वतीने निषेध मोर्चा

 कुर्डूवाडीत शिवसेना व युवा सेनेच्या वतीने निषेध मोर्चा

कुर्डूवाडी(कटूसत्य वृत्त) :- शहर शिवसेने च्या वतीने पक्षाशी गद्दारी करून एकनाथ शिंदे गटाबरोबर गुहाटीत दाखल झलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे आ.शहाजी बापू पाटील व उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडे चे आ.तानाजी सावंत यांचे प्रतिमेला काळे फासून गांधी चौक येथे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निषेध नोंदवून प्रतिमा दहन करण्यात आली.यावेळी समीर मुलाणी, कुमार गव्हाणे,मनोज धायगुडे, रमण शेंडगे, बाबा साळवी बबलू वाल्मिकी सोमनाथ गवळी आकाश गव्हाणे सागर चौधरी महेंद्र मेहता आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

युवा सेनेच्या वतीने गद्दारांचा निषेध कुर्डुवाडी शहर शिवसेना युवा सेना यांच्या वतीने पोस्ट रोड नागोबा गल्ली येथे शिवसेना पक्षाशी गद्दारी केलेल्या सर्व आमदारांच्या विरोधात कुर्डूवाडी शहरातील युवा सैनिकांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी युवा सैनिक विजय किर्वे,रणजित सुतार,आदर्श जाधव,ओम कापसे,ऋतिक मेहरा,सूरज वरपे,यश पवार,धनराज गाढवे,रितेश माने,सागर काशीद,धीरज शिंदे,शाहिद शेख,आशकान तांबोळी, उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments