बँकींग क्षेत्रातील व्यक्तींनी 'क्रिएटिंग वेल्थ थ्रू मार्केट' या विषयावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
.jpg)
पुणे, (कटुसत्य वृत्त):- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे वर्षानिमित्त 'क्रिएटिंग वेल्थ थ्रू मार्केट' या विषयावर शुक्रवार, १० जून रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत आण्णाभाऊ साठे सभागृह, पुणे-सातारा रोड, विवेकानंद पार्क जवळ, पुणे-३७ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी कार्यक्रमात बँकींग क्षेत्रातील जास्तीत जास्त व्यक्तींनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतातील एकुण ७५ केंद्रांवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमामध्ये वित्तमंत्री, भारत सरकार हे दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी https://dipam.gov.in/capitalMarketConfRgstrtn या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक असल्याचे पुणे ग्रामीण चे सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment