पर्यावरणाला हानी पोहचविणा-या वस्तूंचा वापर टाळा उप वनसरंक्षक धैर्यशील पाटील यांचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 6, 2022

पर्यावरणाला हानी पोहचविणा-या वस्तूंचा वापर टाळा उप वनसरंक्षक धैर्यशील पाटील यांचे आवाहन

पर्यावरणाला हानी पोहचविणा-या वस्तूंचा वापर टाळा उप वनसरंक्षक धैर्यशील पाटील यांचे आवाहन

जागतिक पर्यावरण दिनानिमित ६००० सीड बॉलची निर्मिती

पक्षी निरीक्षणास उत्स्फुर्त प्रतिसाद, चित्रकला व छायाचित्रण स्पर्धा उत्साहात

                सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- शाश्वत जीवनासाठी पर्यावरणाला हानी पोहचविणा-या वस्तूंचा कमीत कमी वापर करावा, पर्यावरण विषयी सामान्य लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, वृक्षारोपण करावे, असे आवाहन उप वनसरंक्षक धैर्यशील पाटील यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

                भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो, सोलापूर, महानगरपालिका व उप वनसरंक्षक वन विभाग सोलापूर यांच्या सयुंक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पक्षी निरीक्षण, सीड बॉल निर्मिती कार्यशाळा, प्रश्नमंजूषा, चित्रकला व छायाचित्रण स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर मानद वन्यजीवरक्षक निनाद शहा, सहायक पोलिस अधीक्षक, सत्यसाई कार्तिक, रेल्वेचे सहायक वाणिज्य व्यवस्थापक हर्षित, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी मनीषा पाटील, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते. 

                आपण बनवलेले सीड बॉल निसर्ग संवर्धनसाठी येत्या मान्सुनच्या काळात उपयुक्त ठरतील असे मत श्री पाटील यानी व्यक्त केले. वृक्षारोपणासाठी नागरिकांनी आपल्या घरी सीड बॉल बनवावे असेही त्यानी आवाहन केले.

                शहा म्हणाले, परदेशी झाडांची लागवड करू नये त्यांचे समूळ निर्मूलन करावे. मोठ्याप्रमाणत जुनी झाड़ी टिकवाली पाहिजे जेनेकरून पर्यावरण मूल्य जपले जाईल. 

                हर्षित म्हणाले, दररोज आपण वीज बचत, प्लास्टिकचा कमीत्त कमी वापर यासारख्या छोट्या छोट्या सवयी आंगीकारून पर्यावरणचे संवर्धन करू शकतो.

                श्रीमती पाटील म्हणाल्या की, नैसर्गिक संसाधनाचा आवश्यक असेल तेवढ़ाच वापर करा, सौर ऊर्जावर चालना-या उपकरणांचा वापर करा, प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणाचे संवर्धन करावे.

                चव्हाण म्हणाले ग्लोबल वार्मिंग रोखण्यासाठी ई-कचरा, प्लास्टिक यांचा नियंत्रित वापर करावा पर्यावरण पूरक जीवनशैलीचा अंगीकार करावा, जवळच्या प्रवासासाठी सायकलचा वापर करावा असे आवाहन त्यानी केले.

                पर्यावरण दिनानिमित्त पहाटे ६ ते ८ वाजेपर्यंत पक्षी निरीक्षण करण्यात आले. पक्षी निरीक्षक हेमंत हिरेमठ, निनाद शहा यानी पक्ष्यांचे स्वभाव, त्यांचे आवाज, त्यांच्या विविध प्रजाती विषयी वेगवेगळया ग्रुपना सविस्तर माहिती दिली. यावेळी पंकज चिंधरकर व संजय भुईटे व मंजू संगेपांग यानी सीड बॉल कसे बनवावे, त्याचा निसर्गासाठी कसा वापर करावा याबाबत कार्यशाळा घेवून सविस्तर माहिती दिली. विविध ग्रुपच्या माध्यमातून ६००० सीड बॉलची निर्मिती करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती पाटील व आभार सहायक वनसरंक्षक लक्ष्मण अवारे यांने मानले.

                याप्रसंगी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे- धैर्या गोटे, स्मिता निकामे, योगेश बहिरगोण, सूजल बोरामाणे छायाचित्रण- शिवाणी गोटे, सिद्धनाथ चव्हाण प्रश्नमंजूषा- भीमा गट, कावेरी गट व सीड बॉल स्पर्धेत- संगमेश्वर महाविद्यालयचे ९ महाराष्ट बटालियन एन सी सी व भूगोल विभागाचे विद्यार्थ्यी.

                वनविभागाच्या वतीने औषधी व सावली देना-या झाडांची माहिती देणारे चित्र प्रदर्शनीचे आयोजन केले होते. कार्यक्रमास वाइल्ड लाइफ कोंसेर्वेशन असोशिएशन सोलापूर, इको फ्रेंडली क्लब, युगंधर फाउंडेशन, पर्यावरण सरंक्षण गतिविधी, नेचर कोंसेर्वेशन सर्कल, सोलापूर आदि संस्थानी सहभाग घेतला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages