गुरूदास महाराज तोडमे गुरुजी यांच्या पुण्यस्मरणा निमीत्त श्रीमद्भागवत कथा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 4, 2022

गुरूदास महाराज तोडमे गुरुजी यांच्या पुण्यस्मरणा निमीत्त श्रीमद्भागवत कथा

गुरूदास महाराज तोडमे गुरुजी यांच्या पुण्यस्मरणा निमीत्त श्रीमद्भागवत कथा

                सोलापूर (कटुसत्य वृत्त):- बसवतत्व ह. भ. प. गुरूदास महाराज तोडमे ( गुरुजी ) यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमीत्त सोमवार दि. 06-06-2022 ते रविवार दि. 12-06-2022 पर्यंत श्रीमद्भागवत कथा दु.5.30 वा. व पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ह. भ.प. गुरूदास महाराज तोडमे गुरुजीनी ज्ञानदान खूप केले आहे. अनेक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. खूप साधकांना घडवले आहे. आदी जांबमुनी मोची समाजाचे ते धर्मगुरू होते. समाजाला व्यसन मुक्त करण्यासाठी खुप प्रयत्न ही त्यांनी केले आहेत. कीर्तन- प्रवचन, पाठ, ई. माध्यमातून त्यांनी अनेक साधकांना घडवले आहे. त्यामुळे त्यांचा पुण्यस्मरण सोहळा  आयोजित करण्यात आला आहे. दररोज पहाटे पाच वाजता काकडा आरती, सात वाजता पारायण दु.5.30 वा. श्री मदभागवत कथा होणार आहे. भागवत कथा प्रवक्ते ह भ प सुधाकर महाराज इंगळे सोलापूर हे आहेत. त्यांच्या अमृत वाणीतून कथा श्रवण करण्यास मिळणार आहे. दि.11-06-2022 रोजी स.10.00 वा. ह भ प लक्ष्मण महाराज चव्हाण यांचे गुलालाचे कीर्तन होणार असून 

                दि.12 - 06- 2022 रोजी ह भ प सुधाकर महाराज इंगळे सोलापूर यांचे स.10.00 वा. काला किर्तन होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल.

                कार्यक्रमासाठी जयेंद्र तोडमे महाराज , भागवत जाधव साहेब , दत्तात्रय तोडमे , विष्णू लिंबोळे , युवराज कुरुलकर, ई. पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. 

                हा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन शिवानंद कुटी हरिपाठ मंडळ लष्कर, सोलापूर यांचे माध्यमातून करण्यात आले. सर्व कार्यक्रम वेळेवर सुरू केले जाणार आहेत. तसेच सार्वजनिक मारुती मंदिर देवस्थान, बापूजी नगर, सोलापूर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages