पुन्हा मास्क सक्ती
.jpeg)
पुणे (कटुसत्य वृत्त): मागच्या काही दिवसात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनास्थिती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. कोरोना रुग्णांची संख्या जास्त वाढू नये, म्हणून सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी या नियमांचं पालन करत सहकार्य करण्याचं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आलं आहे. काही दिवसांआधी मास्कमुक्तीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता कोरोना रूग्णांची सध्या वाढत असल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक असेल. कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. ट्रेन, बस, सिनेमा हॉल आणि ऑडिटोरियममध्ये मास्क सक्तीचे करण्यात आले आहे. रुग्णालये, महाविद्यालये आणि शाळांमध्येही मास्क अनिवार्य असेल.
0 Comments