चारचाकींसाठी लवकरच नवीन मालिका आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 10, 2022

चारचाकींसाठी लवकरच नवीन मालिका आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

चारचाकींसाठी लवकरच नवीन मालिका आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

                पुणे (कटुसत्य वृत्त): चारचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी केले आहे.

                प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लवकरच चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. ज्यांना खाजगी चारचाकी वाहनांना हवा असणारा आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवा असेल त्यांनी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) 14 जून 2022 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 दरम्यान कार्यालयाच्या परिवहन विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करणे आवश्यक राहील.

                एकाच क्रमांकाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी 15 जून 2022 रोजी सकाळी 10.30 नंतर कार्यालयीन सूचनाफलकावर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांनी लिलावासाठी जास्त रक्कमेचा एकच धनाकर्ष (डीडी) 15 जून 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात घालून कार्यालयात जमा करावा. धनाकर्ष किमान 301 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आणि ‘आर.टी.ओ.,पुणे’ या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा. त्याच दिवशी दुपारी 4 वाजता लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने जास्तीत जास्त रकमेचा धनाकर्ष सादर केला असेल त्यास पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

                एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेले शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही, असेही कळविण्यात आले आहे. कार्यालयात येणाऱ्या अर्जदारांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages