शरद बँकेची निवडणूक १३ जागेसाठी २३ जणांचे अर्ज दाखल

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील शरद नागरी सहकारी बँकेची सन २०२२-२०२७ या पंचवार्षिक कालावधीकरीता निवडणूक लागली असून १३ जागेसाठी २३ जणांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे आतापर्यंतची बिनविरोध निवडणूकीची परंपरा मोडणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बँकेची सन १९९८ मध्ये स्थापना झाली असून आतापर्यंत बँकेची निवडणूक लागली तरी ती बिनविरोध झालीः मात्र या पंचवार्षिक निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या वाढली असून बिनविरोध परंपरा खंडीत होणार का असा प्रश्न आता निर्माण झआला आहे. बँकेचया एकूण १३ जागेसाठी ही निवडणूक होत आहे.
यामध्ये सर्वसाधारण ८ जागेसाठी उमेदवार मनोहर गणपत सपाटे, महेश महादेव माने, मुकूंद विठ्ठल जाधव, ज्ञानेश्वर बबन सपाटे, अरूण नरसू माने, हेमंत दामू पिंगळे, शिवदास बजरंग चटके, निलेश बसवराज उंब्रजकर, इमाम बाशा सगरी,सुरेश किसन पवार, धनंजय परशुराम चव्हाण, तानाजी रामचंद्र
माने, युन्नुस मेरूबाबा मुजावर, सारंग मधुकर सपाटे, महिला राखीव २ जागेसाठी उमेदवार प्रभावती सुरेश जाधव, मंजुळा मनोहर सपाटे, महानंदा बसवेश्वर सोलापुरे, रेखा सुरेश सपाटे,इतर मागासवर्गीय १ जागेसाठी उमेदवार मार्तंड अरविंद डांगे, शकील नसरूद्दीन इनामदार, अनुसूचीत जाती-जमातीसाठी १ जागेसाठी उमेदवार अनिल जगन्नाथ लोंढे, अनिता तुकाराम माने,भटक्या विमुक्त जागेसाठी १ उमेदवार शंकर धनाजी चव्हाण अशा एकूण १३ जागांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १० जून होती. त्यामुळे शेवटच्या तारखेपर्यंत तब्बल २३ जणांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निवडणुकीसाठी १३ जून रोजी छाननी होणार असून २८ जून ही उमेदवारी माघारी घेण्याची अंतीम तारीख आहे. त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. जर निवडणुक लागली तर ९ जुलै रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होवून निकाल जाहिर होणार आहे.
बँकेचे विद्यमान चेअरमन तथा माजी महापौर मनोहर सपाटे बिनविरोधसाठी प्रयत्न करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांच्या अधिपत्याखालील सोलापूर जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या आदेशान्वये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैशाली साळवे हे कामकाज पहात आहेत.विद्यमान संचालक विजया थोबडे, शिवानंद उंब्रजकर, महंमद शेख, गगन अंकुशे, विलास झरेकर यांनी या निवडणूकीत सहभाग घेतला नाही.
No comments:
Post a Comment