माढ्याच्या नगराध्यक्षा अॅड.मीनल साठे यांना संजिवनी पुरस्कार प्रदान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 2, 2022

माढ्याच्या नगराध्यक्षा अॅड.मीनल साठे यांना संजिवनी पुरस्कार प्रदान

माढ्याच्या नगराध्यक्षा अॅड.मीनल साठे यांना संजिवनी पुरस्कार प्रदान

              माढा (कटुसत्य वृत्त): माढ्याच्या नगराध्यक्षा तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या अॅड.मीनल दादासाहेब  साठे यांना श्री. फौंडेशन व आम्ही उद्योजिका सांगली  यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा संजिवनी पुरस्कार प्रदान करण्यात आला.सांगलीत महिला उद्योजक राज्य परिषदेचे व संजीवनी पुरस्कार वितरण सोहळ्याचे  आयोजन करण्यात आले होते.या समारंभात  महाराष्ट्रातील समाजसेविका व छोटे मोठे उद्योग करणाऱ्या उद्योजिका अशा दोन्ही क्षेत्रातील महिलांना संजिवनी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

              अॅड.साठे यांनी यशस्वी  राजकारणाबरोबरच सामाजीक उपक्रम राबविले याची दखल घेऊन सांगली जिल्हा माहिती अधिकारी  वर्षा पाटोळे,पोलीस उपअधिक्षक सुरेखा दुग्गे यांच्या प्रमुख हस्ते अॅड.साठे यांना सन्मानपत्र,सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील  मान्यवर  महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.माढा नगरपंचायत चे नगरसेवक,प्रियदर्शनी महिला मंडळाच्या सदस्यांनी अभिनंदन करुन सत्कार केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages