फिल्मी स्टाईलने ट्रकची चोरी, हातपाय बांधून चालकाला शेतात फेकले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 6, 2022

फिल्मी स्टाईलने ट्रकची चोरी, हातपाय बांधून चालकाला शेतात फेकले

फिल्मी स्टाईलने ट्रकची चोरी, हातपाय बांधून चालकाला शेतात फेकले

               सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ट्रक चालकाचे हातपाय बांधून शेतात फेकला अन् स्टीलने भरलेला ट्रक चक्क पळवून नेला. जालन्याहून सांगलीकडे 13 टन स्टील घेऊन जाणाऱ्या ट्रकला रस्त्यात अडवून ट्रक पळवून नेल्याची घटना सोलापुरातील आष्टी शिवारात घडलीय.

               प्रवीण सरगर हे ट्रक चालक स्टीलने भरलेला ट्रक घेऊन जाते होते. यावेळी अज्ञात सहा जणांच्या टोळक्यांनी ट्रक थांबवला. यावेळी चोरट्यांनी तलवार आणि बंदुकीचा धाक दाखवत ट्रक ड्रायव्हरचे हातपाय बांधून आष्टी शिवरातील उसाचा फडात फेकून दिले. त्यानंतर या टोळक्याने ट्रक घेऊन पसार झालेत.

               याबाबत अज्ञात सहा जणांविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी 13 टन स्टील ट्रकसह पळवले. या स्टीलची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. एकूण 13 लाख 61 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे. या चोरट्यांच्या मागावर सोलापूर ग्रामीण पोलिसांची तीन पथक असल्याची माहिती मोहोळ पोलिसांनी दिलीय.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages