महिन्यात होणार रखडलेल्या 14 महापालिकांच्या निवडणुका?,राज्य निवडणूक आयोगाचे संकेत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 6, 2022

महिन्यात होणार रखडलेल्या 14 महापालिकांच्या निवडणुका?,राज्य निवडणूक आयोगाचे संकेत

महिन्यात होणार रखडलेल्या 14 महापालिकांच्या निवडणुका?,राज्य निवडणूक आयोगाचे संकेत

               मुंबई,(कटूसत्य वृत्त):- राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुकांसंदर्भात  मोठी बातमी समोर येतेय. येत्या जुलै ते ऑक्टोबर दरम्यान राज्यातील रखडलेल्या 14 महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.राज्य निवडणूक आयोगानं  यासंदर्भातले संकेत दिले आहेत. एबीपी माझानं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. 31 मेपर्यंतची मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचंही समजतंय. ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुका रखडल्या.दरम्यान सर्वोच्च न्यायालयात ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर पार पडलेल्या सुनावणीत राज्य सरकारनं केलेला कायदा फेटाळला आणि 15 दिवसात निवडणुका जाहीर करा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लवकरच 14 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाचे संकेत यासर्व घडामोडीनंतर राज्यात होणाऱ्या 14 महापालिका निवडणुकांच्या तारखांबाबत पहिल्यांदाच राज्य निवडणूक आयोगानं संकेत दिलेत. येत्या जुलै ते ऑक्टोबर दरम्यान मुंबई, ठाणे, नागपूर महानगरपालिकेसह 14 महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

               9 महिन्यांपूर्वी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच संभाव्य तारखांबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून संकेत मिळाले आहेत. तसंच राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसाठी 31 मेपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरणार आहेत, असं आयोगानं निश्चित केलं आहे. राज्य निवडणूक आयोगाचं आयुक्तांना पत्र राज्य निवडणूक आयोगानं 14 नागरी संस्थांच्या महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात म्हटलं आहे की, स्थानिक-स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तीन टप्पे आहेत.

               प्रभाग आणि आरक्षण सोडत, निवडणूक आयोगानं तयार केलेली विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी जाहीर करणं आणि तिसरी पायरी म्हणजे निवडणूक. 14 महापालिकांची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे. तसंच या निवडणुकीसाठीची मतदार यादी 7 जुलैपर्यंत जाहीर करण्यात येईल. प्रलंबित महापालिका निवडणुका मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, अकोला, अमरावती या 14 शहरांतील महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. जिल्हा परिषदांच्या प्रलंबित निवडणुका रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. राज्यातील 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहे. यातल्या काही जिल्ह्यात महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रलंबित आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages