RBI च्या नवीन सुविधेमुळे ग्राहक केवळ UPI च्या मदतीने एटीएममधुन काढू शकतात पैसे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 18, 2022

RBI च्या नवीन सुविधेमुळे ग्राहक केवळ UPI च्या मदतीने एटीएममधुन काढू शकतात पैसे

RBI च्या नवीन सुविधेमुळे ग्राहक केवळ UPI च्या मदतीने एटीएममधुन काढू शकतात पैसे



नवी दिल्ली (वृत्त सेवा):- बँकिंगच्या पद्धतींमध्ये बदलत्या काळानुसार मोठे बदल झाले आहेत. आजकाल फार कमी प्रमाणात लोक बँकेच्या लांबच लांब रांगेत उभे राहून पैसे काढतात. बहुतेक लोक एकतर नेट बँकिंग, UPI किंवा एटीएममधून पैसे काढतात.पण, जर तुम्ही घरातून बाहेर पडताना एटीएम कार्ड ठेवायला विसरला, तर त्यासाठी घरी जाण्याची गरज नाही. देशातील अनेक मोठ्या बँका एटीएम कार्ड नसतानाही ग्राहकांना पैसे काढण्याची सुविधा देतात. अलीकडेच, भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे, ज्याद्वारे ग्राहक केवळ UPI च्या मदतीने एटीएम कार्डशिवाय पैसे काढण्याचा फायदा घेऊ शकतात.या संदर्भात माहिती देताना आरबीआयचे गव्हर्नर म्हणाले की, ग्राहकांना आता एटीएम कार्डशिवायसुद्धा कार्डलेस कॅश काढण्याच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. देशातील सर्व बँकांचे एटीएम बदलून UPI ​​पर्याय अपडेट केला जात आहे.अशा दोन प्रकारे काढू शकता एटीएममघून पैसे तुम्हाला UPI द्वारे पैसे काढण्यासाठी, प्रथम एटीएम मशीनमध्ये विनंती तपशील भरावा लागेल.हा तपशील भरल्यानंतर, तुमच्याकडे एक QR कोड तयार होईल.त्यानंतर तुम्हाला तुमचे UPI अॅप उघडावे लागेल आणि तो QR कोड स्कॅन करावा लागेल.या स्कॅनिंगनंतर, तुमची विनंती मंजूर केली जाईल.यानंतर, रक्कम भरल्यानंतर, तुम्ही एटीएम मशीनमधून पैसे काढू शकाल.तसेच एटीएम मशीनमध्ये UPI आयडी भरावा लागेल त्यानंतर जेवढी रक्कम तुम्हाला काढायची आहे, ती देखील भरावी लागेल. यानंतर एक रिक्वेस्ट तुमच्या UPI अॅपवर येईल, जी भरली पाहिजे.अॅपमध्ये पिन टाकून तुम्हाला विनंती मंजूर करावी लागेल.ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकाल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages