लोकशाहीला काळीमा; भाजप आमदाराच्या विरोधात बातमी: पोलिसांनी पत्रकारांना अर्धनग्न करून केले उभे
भोपाळ (वृत्त सेवा):- भाजप आमदाराच्या विरोधात बातम्या चालवल्याने पत्रकारांना अर्धनग्न करून पोलिस ठाण्यात उभे केले. पोलिसांनी त्यांना केवळ अंतर्वस्त्र परिधान करून उभे केले. या पत्रकारांची समाजात बदनामी व्हावी यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक हे छायाचित्र व्हायरल केल्याचा आरोपही केला जात आहे. हा प्रकार मध्य प्रदेशातील सिंधी जिल्ह्यात घडला.
यातील एका पत्रकाराचे नाव कनिष्क तिवारी आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवर १.२५ लाख सबस्क्राइबर्स आहेत. सोबतच त्याचे न्यूज चॅनल न्यूज नेशनशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे. या संपूर्ण घटनेबाबत त्याने लेखी तक्रारही दाखल केली आहे. कनिष्क तिवारीने पंजाब केसरी, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या स्थानिक वृत्तपत्रांशी संवाद साधत घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. पोलिस आणि आमदाराच्या विरोधात बातम्या चालवल्या तर पुढच्या वेळी नग्न करून शहरात फिरवले जाईल, असे पोलिसांनी म्हटल्याचे सांगितले.
देशातील पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांविरोधात बुधवारी दिल्लीतील अनेक पत्रकार संघटनांनी एकजूट दाखवून आवाज उठवला होता. परंतु, त्याचा कोणताही परिणाम विद्यमान सत्ताधारी पक्ष भाजपवर झाला नाही. ते निर्लज्जपणे लोकशाहीच्या रक्षकांवर हल्ले करीत आहेत. या घटनेनंतर सोशल मीडियावर पोलिस आणि मध्य प्रदेशच्या भाजप सरकारवर जोरदार टीका होत आहे. हे मध्य प्रदेशातील सिंधी जिल्ह्यातील यूट्यूबर्स आहेत. त्यांचा गुन्हा काय आहे हे माहित नाही. परंतु, कोणताही गुन्हा इतका गंभीर असू शकत नाही की त्यांना अर्धनग्न करून उभे केले जाईल. ही मानवी हक्कांची आणि मानवी प्रतिष्ठेची उघड थट्टा आहे, असे छत्तीसगडमध्ये पत्रकार रितेश मिश्रा यांनी ट्विट करून लिहिले.
या घटनेवर राजकारण्यांकडूनही टीका होत आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री निवास यांनी लिहिले की, हे चित्र मध्य प्रदेशातील सिंधी पोलिस स्टेशनचे असून, एक तरुण स्थानिक पत्रकार अर्धनग्न अवस्थेत उभा आहे. त्यांचा गुन्हा असा आहे की त्यांनी भाजप आमदाराविरुद्ध बातम्या चालवण्याचे धाडस केले.
0 Comments