सोलापूर (कटूसत्य वृत्त): शासन एकीकडे वाचाल तर वाचाल.. गाव तेथे ग्रंथालय ही संकल्पना राबविण्यास राबविण्यास सांगते.दुसरीकडे १० वर्षे लोटूनही तुटपुंजे अनुदान आणि त्यातच कर्मचाऱ्यांच्या पगारापासून स्टेशनरी, पुस्तक खरेदी यासारख्या गरजा भागवाव्या लागतात.अशाने ग्रंथालय कशी चळवळ फोफावणार?भविष्यात ग्रामीण भागातील ड वर्गाची ग्रंथालये बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे वास्तव समोर येत आहे.सोलापूर जिल्ह्यात अ,ब,क आणि ड वर्गाची ९४७ ग्रंथालये आणि २५०० कर्मचारी आहेत. राज्यात ही संख्या १२ हजार १४५ आहे. या वाचनालयांमध्ये २१ हजार ६१५ कर्मचारी अवलंबून आहेत. सोलापूर शहरातील हिराचंद नेमचंद वाचनालय जिल्हा ग्रंथालय अ वर्गात मोडते. या वाचनालयाला वर्षाला ७ लाख २० हजार अनुदान मिळते. इतर अ वर्गासाठी २ लाख ८८ हजार अनदान, ब वर्गासाठी १ लाख ९२ हजार, क वर्गासाठी ९६ हजार आणि ड वर्गासाठी ३० हजार अनुदान मिळते. या अनुदानावरच कर्मचाऱ्याच्या पगारापासून सारं काही अवलंबून आहे.
0 Comments