अण्णा भाऊ साठे पुतळा परिसरात वाढलेले अतिक्रमण हटविण्यातची मागणी हुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते केली
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा परिसरात वाढलेले अतिक्रमण हटविण्यात यावे या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते बुधवारी महापालिकेत आले. यामुळे संतापलेल्या आयुक्तांनी कार्यकर्त्यांना निवेदन न स्वीकारताच परत पाठविले.महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची सायंकाळी अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू होती. अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे.यावेळी क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते आले.आयुक्तांना भेटण्यास विलंब लागत असल्याने शिपायाला धक्काबुक्की करीत कार्यालयात घुसले. अतिक्रमण प्रतिबंधक विभाग प्रमुखांची भेट घेऊन तक्रार देण्याबाबत कळविले.दरम्यान, आमदार विजयकुमार देशमुख काही तक्रारी घेऊन आयुक्त कार्यालयात आले होते. आमदारांसाठी आयुक्तांना वेळ आहे. असे म्हणत आयुक्त कार्यालयासमोर घोषणाबाजी सुरू झाली. गोंधळ वाढल्याने पोलीस आले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना का वेळ देता येत नाही,या गोंधळातच त्यांनी कार्यकर्त्यांना खडसावले. उपस्थित झोन कार्यकर्ते शिपायाला धक्काबुक्की करून आयुक्तांना निवेदन देण्यास गेले. हा प्रकार पाहून आयुक्त संतापले. कार्यालयात अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत बाहेर काढले.
0 Comments