थकबाकीदारांना व्याजात ५० टक्के सवलत;गैरप्रकार थांबविण्यासाठी ऑनलाईन व्यवहार सुरु
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- थकबाकीदारांना व्याजात ५० टक्के सवलत, दोन हजार लिटर दुधापासून दुग्धजन्य पदार्थ, गैरप्रकार थांबविण्यासाठी ऑनलाईन व्यवहार,गाव तेथे दूध व दुग्धजन्य पदार्थांची एजन्सी सुरु करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सलग साडेसहा तास चालणाऱ्या बैठकीत संघाला गतवैभव आणण्यावर झटपट निर्णय झाले. दूध संघाचे माजी संचालक तसेच दूध पशुखाद्य, गाय खरेदीसाठी उचल व इतरसाठी उचललेली रक्कम थकीत आहे.
मुद्दलावर वरचेवर व्याज वाढत संस्थांकडे आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी विभागीय उपनिबंधकाकडे पाठविला जाणार आहे. चेअरमन निवडीपर्यंत २०० लिटरपासून दुग्धजन्य पदार्थ तयार केले जात होते. जवळपास २५ दिवसांत दुग्धजन्य पदार्थ तयार करणे व विक्रीत वाढ झाली आहे.न्यायालयाने दिलेल्या निर्णयातील प्रकरणे वगळून इतर थकबाकीदारांना व्याजात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय झाला. सध्या ९०० लिटर दुधापासून दुग्धजन्य पदार्थ तयार होत आहेत. ते महिनाभरात २ हजार लिटरवर जाण्यासाठी संचालक व कर्मचाऱ्यांनी काम करण्याचा निर्णय झाला. संपूर्ण कारभार पारदर्शक चालावा यासाठी ऑनलाईन कॅश ट्रॅजेक्शन करण्यात येत असून त्यात कसलीही तडजोड होणार नाही असे ठरले.
0 Comments