हुकूमशाही पध्दतीने मोदीसरकार प्रत्येक गोष्टीचा भाव वाढवत आहे - महेश तपासे
मुंबई (नासिकेत पानसरे):- सामान्य लोकांचा विचार न करता हुकूमशाही पध्दतीने मोदी सरकार प्रत्येक गोष्टीचा भाव वाढवत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस आणि खाद्यतेल, अन्नधान्य यांचे दर गगनाला भिडले असतानाच सामान्य लोकांसाठी जीवनावश्यक असलेल्या ८०० औषधांच्या किमती एक एप्रिलपासून ११ टक्क्यांनी वाढवल्या आहेत असेही महेश तपासे म्हणाले.
दोन वर्षाच्या कोरोना काळात रोजगार नसल्याने लोकं हैराण झाले होते त्यातून सावरत असताना आता सर्वसामान्य जनतेचे महागाईने कंबरडे मोडले आहे त्यामुळे हा सर्व बोझा सामान्य लोकांच्या डोक्यावर पडून आर्थिक गणिते बिघडवत आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.
0 Comments