माळी समाज सर्व शाखीय, राज्यस्तरीय वधू - वर पालक परिचय मेळाव्याचे रविवारी आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 19, 2022

माळी समाज सर्व शाखीय, राज्यस्तरीय वधू - वर पालक परिचय मेळाव्याचे रविवारी आयोजन

माळी समाज सर्व शाखीय, राज्यस्तरीय वधू - वर पालक परिचय मेळाव्याचे रविवारी आयोजन

          सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अखिल भारतीय माळी महासंघ व संत सावतामाळी प्रतिष्ठान सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० वा. संत शिरोमणी सावता महाराज तिर्थ क्षेत्र अरण, ता. माढा, जि. सोलापूर येथे माळी समाजाचा सर्व शाखीय वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये वेळ, पैसा, मानसिक त्रास वाचविण्यासाठी एकाच ठिकाणी शेकडो वधु-वर पालक यांचा परिचय करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक वधू-वरांच्या पालकांनी वधू-वर परिचय नोंदणी फॉर्म दि. २० एप्रिल २०२२ पर्यंत भरून संपर्क कार्यलयात द्यावेत. फॉर्म मागणी केल्यास आपल्या व्हाट्सअप नंबर, ईमेलवर मोफत पाठविले जातील या मेळाव्यात माळी समाजातील सर्व शाखेतील प्रथम वधू-वर, घटस्फोटीत, विधवा, विधूर, अपंग, वधू-वर यांची नोंदणी घेण्यात येईल. वधू वर मेळावा नोंदणी फी ५००/-रु. आणि वेबसाईट नोंदणी फी ५०० रु. ठेवण्यात आली आहे.

          या प्रसंगी महाराष्ट्रातील १५ कवीयत्रिंना आद्य कवयित्री सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मेळाव्यात समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे ठराव महाराष्ट्रातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहेत. तरी समाज बांधवांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा. नोंदणी व अधिक माहितीसाठी लिंगे उद्योगसमूह एस. टी.स्टँड समोर सोलापूर ७२१८५२४४७१ या नंबर वर संपर्क करावा. असे आवाहन महासंघाच्या वतीने शंकरराव लिंगे यांनी पत्रकार परिषदेत केले.

          यावेळी अंगद माळी, संतोष गायकवाड, संजय इनामदार, सुरेश गोरे, अनिल राऊत, भाऊसाहेब झगडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages