सोलार ट्री : सांगोला नगरपरिषदेची अभिनव संकल्पना ! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 28, 2022

सोलार ट्री : सांगोला नगरपरिषदेची अभिनव संकल्पना !

 सोलार ट्री : सांगोला नगरपरिषदेची अभिनव संकल्पना !

सौरऊर्जा वापराबाबत जनजागृती साठी उभारली प्रतिकृती

          सांगोला (कटूसत्य वृत्त):- पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या पृथ्वी, जल, आकाश,वायू,अग्नी या पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये सांगोले नगरपरिषदेमार्फत  पर्यावरण संरक्षण व संवर्धन करणेसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.या अभियानांतर्गत असणाऱ्या पंचमहाभूतां पैकी अग्नी या घटकांतर्गत  सांगोला शहरातील नागरिक,व्यापारी वर्गामध्ये सौरऊर्जा वापराबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने नगरपरिषदेमार्फत जुन्या सोलार प्लेट्स चा वापर करून *"सोलार ट्री"* ही प्रतिकृती तयार करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

          सूर्य हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. सौर ऊर्जा घेण्यासाठी घरात कुठल्याही प्रकारचा मीटर बसवावा लागत नाही व कुठलेही बिल भरावे लागत नाही.

          मोठ्या प्रमाणात सूर्याची ऊर्जा उपलब्ध असून त्याचा आपण जर उपयोग करू शकलो तर निसर्गातील झाडांची तोड थांबू शकेल. त्यामुळे पर्यावरण ह्रासालाही आळा बसेल.दिवसातील १२ तास सौर ऊर्जा आपल्या बरोबरच असते. उरलेल्या १२ तासांसाठी आपण सौर ऊर्जेची बॅटऱ्यांमध्ये साठवण करून रात्रीच्या वेळी वीज उपयोगात आणू शकतो यासाठी खर्च सुद्धा अल्पप्रमाणात येतो. त्याच प्रमाणे आपल्या वापरातून शिल्लक राहिलेली वीज आपण वीज वितरण महामंडळाला विकुन नफा देखील मिळवू शकतो.सौरऊर्जा निर्मितीत आणि नंतर वापरातही कुठल्याही  प्रकारचे अपायकारक वायू वातावरणात सोडले जात नाहीत. हा एक प्रदूषण मुक्त ऊर्जास्त्रोत आहे. त्यामुळे प्रदूषण, जागतिक तापमानवाढ यांसारखे इतर ऊर्जाक्षेत्राप्रमाणे निर्माण होणारे  वादांचे विषय सौरऊर्जेच्या बाबतीत येत नाहीत. 

          कोळसा, पेट्रोल, डिझेल या ऊर्जास्त्रोतांचे साठे हे अत्यंत मर्यादित आहेत व ते संपण्याच्या मार्गावर असल्याने भविष्यात सौरऊर्जा शिवाय मानवाला पर्याय नसेल.त्यामुळे सौरऊर्जा वापरला प्रोत्साहन मिळणे व जनमानसात सौरऊर्जेच्या फायद्याची जनजागृती मोठ्या प्रमाणात होणे अत्यंत आवश्यक बनले आहे. हेच ओळखून सांगोला शहरातील नागरिक,व्यापारी वर्गामध्ये सौरऊर्जा वापराबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने नगरपरिषदेमार्फत जुन्या सोलार प्लेट्स चा वापर करून *"सोलार ट्री"* ही प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.हा सोलार ट्री सांगोले शहरातील आरक्षण क्र- 47 बगीच्या मध्ये उभा करण्यात आला आहे. सोलार ट्री ची प्रतिकृती तयार करण्यासाठी जुन्या सोलार प्लेट वापरण्यात आल्याने सौरऊर्जा वापराबरोबरच 3R तत्वे ( Reduce, Reuse, Recycle) यांचाही संदेश देण्याचा प्रयत्न नगरपरिषदेमार्फत करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

          सदर सोलार ट्री उभारण्यात मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभागाकडील लाईटमन श्री किसन मोरे व इतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

          जगाची लोकसंख्या ही अत्यंत वेगाने वाढत असताना या लोकसंख्येच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात विजेची मागणी देखील वाढत आहे.पेट्रोल डिझेल,कोळसा यांचे साठे मर्यादित असल्याने त्यांना पर्याय म्हणून सौरऊर्जेच्या वापरावर सर्वांनी भर देणे काळाची गरज आहे.लाईनमन किसनजी मोरे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या या "सोलार ट्री" च्या प्रतिकृतीतून शहरातील नागरिकांमध्ये सौरऊर्जा वापराबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती होईल अशी आशा वाटते. - कैलास केंद्रे (मुख्याधिकारी सांगोला नगरपरिषद)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages