Hot Posts

6/recent/ticker-posts

ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करावे - प्रांतधिकारी गजानन गुरव

ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करावे - प्रांतधिकारी गजानन गुरव

पंढरपूर(कटुसत्य वृत्त):- राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य असून, राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा. प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर व निर्मिती  करु नये, ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करुन आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान ठेवावा  असे आवाहन प्रांतधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दि.01 मे 2022 रोजी सकाळी 8.00 वाजता तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, राष्ट्रध्वज कार्यक्रमाच्या ठिकाणी, रस्त्यावर व अन्य ठिकाणी फेकून देऊ नयेत. राष्ट्रध्वज खराब झाल्याचे आढळल्यास ध्वजसंहितेच्या तरतूदीनुसार नष्ट करणे आवश्यक आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना होणे हे बोधचिन्ह व नावे अधिनियम 1950 तसेच राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 अन्वये ध्वजसंहितेच्या तरतूदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.  

राष्ट्रध्वज खराब झाल्याचे आढळल्यास  ते सन्मानपुर्वक नजीकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात जमा करावेत. असे आवाहनही प्रांतधिकारी श्री.गुरव यांनी केले आहे. 

Reactions

Post a Comment

0 Comments