पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण

सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- महाराष्ट्र स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते 1 मे 2022 रोजी सकाळी 8:00 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पोलीस परेड मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
मुख्य शासकीय समारंभात नागरिकांना उपस्थित राहता यावे म्हणून सकाळी 7.15 ते 9 च्या दरम्यान कोणत्याही शासकीय अगर निमशासकीय कार्यालयांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करु नये. ज्यांना असा स्वतंत्र ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करावयाचा आहे, त्यांनी तो 1 मे रोजी सकाळी 7.15 पूर्वी किंवा 9 च्या नंतर करावा.
0 Comments