एमपीएससी परीक्षेत निमगाव(टे.) येथील वैभव शिंदे राज्यात सातवा... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, April 30, 2022

एमपीएससी परीक्षेत निमगाव(टे.) येथील वैभव शिंदे राज्यात सातवा...

एमपीएससी परीक्षेत निमगाव(टे.) येथील वैभव शिंदे राज्यात सातवा...

          बेंबळे (कटुसत्य वृत्त)माढा तालुक्यातील निमगाव टे. येथील वैभव भाऊराव शिंदे हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे  घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यात 7 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. वैभव शिंदे हा पहिल्यापासूनच हुशार बुद्धिमत्तेचा विद्यार्थी म्हणून सर्व परिचित आहे.त्याचे प्राथमिक शिक्षण निमगाव टे. येथील प्राथमिक शाळेत व पुढील शिक्षण पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी मध्ये झाले आहे. बारावीपर्यंत गरवारे कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातून वैभवाने बी.ई. मेकॅनिकल ही पदवी प्राप्त केली आहे तसेच तो पॉलिटिकल सायन्स मधून सेट नेट उत्तीर्ण झालेला आहे. एमपीएससी मध्ये कसून अभ्यास करून वैभव शिंदे याने क्लास वन ऑफिसर होण्यासाठीच हे यश संपादन केले आहे. वैभव चे वडील भाऊराव शिंदे हे जि प प्राथमीक शाळा पिंपळनेर येथे केंद्रप्रमुख आहेत.

          वैभव यास सारथी प्रशिक्षण संस्था, प्राचार्य महेंद्र कदम, बीडिओ संताजी पाटील, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, चीफ इंजिनियर छगन भोगडे,  तहसीलदार राजेश चव्हाण ,सहाय्यक गटविकास अधिकारी प्रताप पाटील, मारुती फडके व गटशिक्षणाधिकारी बंडू शिंदे या मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

          वैभव शिंदे यांने मिळवलेल्या यशाबद्दल आमदार बबन दादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे दूध संघाचे चेअरमन रंणजीत भैय्या शिंदे माढा तालुक्याचे सभापती विक्रम दादा शिंदे पंचायत समिती सदस्य धनराजदादा शिंदे विठ्ठल कार्पोरेशन चे चेअरमन यशवंत शिंदे आदी  सहित अनेक शिक्षण संस्थेतील मान्यवर, तसेच वरिष्ठ अधिकारी, राजकीय पुढारी, राजकीय पदाधिकारी व जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकारांनी वैभव याचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages