Hot Posts

6/recent/ticker-posts

इच्छा माझी पूरी करा",सांगोला गटविकास अधिकार्याच्या आडमुठेपणामुळे लाखो रुपयांचा चकाचूर

इच्छा माझी पूरी करा",सांगोला गटविकास अधिकार्याच्या आडमुठेपणामुळे  लाखो रुपयांचा चकाचूर


प्रशस्त केबीन असताना नवीन केबीनची केली निर्मिती

          सोलापूर (विशेष प्रतिनिधी) सांगोला पंचायत समितीचे सभापती गटविकास अधिकारी म्हणून रुजू झालेले आनंद लोकरे या ना त्या कारणाने नेहमीच वादग्रस्त ठरलेले आहेत.सांगोला पंचायत समितीचा  पदभार घेताच त्यानी स्थापनेपासुन गटविकास अधिकारी वापरत असलेली केबीन बदलली असून त्यासाठी लाखो रुपयाचा चुराडा केल्यामुळे पंचायत समितीचे सभापती आजी माजी पदाधिकारी मात्र आनंद लोकरे यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.प्रशस्त,हवेशीर,सुसज्ज केबीन असताना वेगळ्या ठिकाणी घेवुन जाण्याचा अट्टाहास का?असा प्रश्न सामजिक कार्यकर्त्याना पडलेला आहे.

          मुळातच गटविकास अधिकारी हे अबोल मनाचे असून सामान्य नागरिकांना वेळ देत नसल्याच्या तक्रारी वरिष्ठ पातळीवर गेलेल्या आहेत.मात्र गटविकास अधिकार्यावर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.तालुक्यातील अंतिम टोकाच्या गावातून आलेल्या नागरिकांना गटविकास अधिकार्याच्या भेटीसाठी ताटकळत थांबावे लागत असल्याची परिस्थिती सध्या दिसून येत आहे.

          प्रशस्त आणि देखणी केबीन करण्यापेक्षा कामाचा आदर्श ठसा उमठावा,अशी अपेक्षा सामान्य नागरिकाची आहे.काम करण्याची जागा हवेशीर आणि प्रशस्त असावी,हे जरी वस्तूस्थिती असली तरी गेल्या पन्नास वर्षापासुन  अधिकार्यानी ज्या केबीनमधुन प्रशासकीय कारभार पाहिला,त्याच केबीन मधुन बाहेर पडून वेगळी चूल मांडण्याची दुर्बुधी गटविकास अधिकारी यांना का सुचावी?हा प्रश्न मात्र अनुतरित आहे.नव्या केबीन मध्ये जवळपास लाखो रुपये खर्च केल्याचा गाजावाजा असून हा खर्च कोणत्या योजेनेतून केला,हे मात्र समजले नाही. नव्या केबीन मध्ये बसविलेले फर्नीचर हे त्याच्याच मालकीच्या दुकानातून विकत घेतल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments