राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेवगा लागवडीसाठी प्रस्ताव सादर करा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 21, 2022

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेवगा लागवडीसाठी प्रस्ताव सादर करा

 राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेवगा लागवडीसाठी प्रस्ताव सादर करा पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) (अनुसुचित जाती उपयोजना) योजनेअंतर्गत जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे 11 तालुक्यातून 15 हेक्टर क्षेत्रात वैरणीसाठी शेवगा लागवडीसाठी 30 एप्रिल 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एन.ए. सोनवणे यांनी केले आहे.  

या योजनेंतर्गत फक्त अनुसुचित जाती प्रवर्गातील पशुपालक शेतकऱ्यांना वैरणीसाठी शेवगा लागवड करण्यासाठी अनुदान वितरीत करण्यात येणार अहेत. योजनेंतर्गत प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा कमीत कमी व अधिकतम एक हेक्टर असून प्रती हेक्टर 7.5 किलो शेवगा (पीकेएम-१) बियाणाची किंमत 6750 रूपये आणि उर्वरित अनुदान 23,250 रूपये हे दोन टप्प्यांमध्ये वितरीत करण्यात येणार आहे. बियाणाचा थेट पशुपालकांना पुरवठा करण्यात येणार असून उर्वरित अनुदानातून जमिनीची मशागत व लागवड, खतांची खरेदी व इतर अनुषंगिक खर्च करावयाचा आहे.

या योजनेसाठी इच्छुक पशुपालक / शेतकरी यांनी संबंधित पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती आणि नजीकचा पशुवैद्यकिय दवाखाना यांच्याशी संपर्क साधावा. योजनेची माहिती, मार्गदर्शक सूचना, अर्जाचा नमुना इत्यादी उपलब्ध करुन देण्यात आलेला असून 30 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज भरुन द्यावेत, असे आवाहन डॉ. सोनवणे यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages