हलदहिवडी येथे मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

लायन्स क्लब सांगोला,श्रीराम भक्त मंडळ व ग्रामस्थ हलदहिवडी कडून आयोज
सांगोला (कटूसत्य वृत्त):- इंटरनॅशनल असोसिएशन लायन्स क्लब्ज माध्यमातून जगामधील चौतीस कोटी लोकांना दृष्टी देण्याचे कार्य झाले आहे. यापुढेही दृष्टिहीनाना दृष्टी देण्याचे अविरत कार्य चालूच राहणार आहे. लायन्स क्लबच्या साईट फस्ट या मोहिमेतून दृष्टिहीनांना दृष्टी देणे तसेच डोळ्यांची काळजी घेणे या संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते.यानुसार 'आम्ही सेवा देतो' या ब्रीद वाक्याप्रमाणे ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके (माजी प्रांतपाल) यांचे मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब ऑफ सांगोला, श्रीराम भक्त मंडळ व ग्रामस्थ हलदहिवडी व श्रीमंत विजयसिंह पटवर्धन आय हॉस्पिटल सांगली यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन दि.२० एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०.३०.वा. मौजे हलदहिवडी ता.सांगोला येथे झाले.यावेळी धनंजय तातोबा चव्हाण (माजी सरपंच), लायन्स क्लब ऑफ सांगोला अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण, सचिव ला.उन्मेश आटपाडीकर, सदस्य ला.प्रा.दिलीप मस्के,ला.प्रा.मिलिंद देशमुख, हलदहिवडी ग्रामस्थ मा.विलास लक्ष्मण झुरे, मा.राहुल ज्योतीराम पाटील, मा.बजरंग केराप्पा पारसे,सौ.सुवर्णा रामचंद्र पाटील, लायन्स आय हॉस्पिटलचे डॉ.रियाज मुल्ला उपस्थित होते.
या शिबिरामध्ये १०५ लोकांची डोळे तपासणी झाली व ८ रुग्ण मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी सांगली येथे पाठविण्यात आले व २५ गरजू लोकांसाठी मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी श्रीराम भक्त मंडळ , लक्ष्मण लेंडवे,समाधान लेंडवे(माजी उपसरपंच) , नितीन चव्हाण, गणेश कदम, गजानन नलवडे, सत्यवान चव्हाण, सुधीर पाटील,जावेद तांबोळी यांचेसह हलदहिवडी ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
लायन्स क्लब ऑफ सांगोला कडून गेल्या पाच वर्षांत तीन ते चार हजार लोकांची नेत्रतपासणी केली आहे व चारशे ते पाचशे लोकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत व लायन वर्ष सन २०२१-२२ मध्ये लक्ष्मीनगर, घेरडी, आलेगाव, कोळा,व हलदहिवडी येथील शिबीराच्या माध्यमातून गरजूंना त्यांच्या दारापर्यंत जाऊन आरोग्य विषयक सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे.
No comments:
Post a Comment