उस तोडणी कामगार व शेतकऱ्यांची लूटमार थांबवा अन्यथा कारखानदारांनी नुकसान भरपाई द्यावी-देशमुख
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील जवळपास सर्वच साखर कारखान्याच्या ऊस तोडणी कामगारांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरू असून एकरी १० ते १५ हजार रुपयांची मागणी करून ठिंबक असतानाही ऊस जाळून मिळण्याची भाषा वापरतात, परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची मागणी शेतकरी नेते प्रभाकर भैय्या देशमुख यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी स॔घटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी प्रत्यक्ष निवासी जिल्हाधिकारी शमा पवार व अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव साहेब यांना प्रत्यक्ष भेटून ही मागणी केली आहे. ऊस तोडणी टोळी कामगार अतिरिक्त ऊस जादा असल्यामुळे शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. तसेच ते उसात ठिबक असताना सुद्धा टोळेवाले जाळून नेतो अशी भाषा वापरतात. शेतकऱ्यांची होणारी लूट त्वरित थांबवावी अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी गणेश काकडे, चंद्रकांत निकम, सुहास चव्हाण, नागेश कोकरे, अज्ञानसिद्ध माळी, पंडित गव्हाणे, शिवाजी जाधव, रामभाऊ शिरगिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments