आज विठ्ठल - रुक्मिणी मूर्तीची प्रतिष्ठापणा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नेहरू औद्योगिक कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था क्रमांक २,बी गट, भैरव कॉलनी दमानी नगर येथील गडदर्शन समाज मंदिरात बुधवार दिनांक ६ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सहअध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अमृतहस्ते आणि अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह .भ .प. सुधाकर महाराज इंगळे यांच्या दिव्य सानिध्यात श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार असल्याची माहिती, गडदर्शन सोसायटीचे चेअरमन शिवदास चटके आणि सचिव नागनाथ जावळे यांनी दिली.
या सोहळ्यानिमित्ताने सकाळी गडदर्शन सोसायटी परिसरातून टाळ-मृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते आणि सोसायटीच्या संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रोच्चाराच्या जयघोषात मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापणा होईल.तसेच दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत भाविकांना गडदर्शन समाज मंदिराच्या सभागृहात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.आणि सायंकाळी ७ वाजता मंदिराच्या प्रांगणात ह.भ.प. माऊली बचुटे महाराजांचे कीर्तन होणार आहे. या धार्मिक सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
0 Comments