Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकशाही दिनात 2 अर्जावर सुनावणी

लोकशाही दिनात 2 अर्जावर सुनावणी


 

सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- आजच्या लोकशाही दिनात आलेल्या दोन अर्जावर सुनावणी झाली. प्राप्त झालेले 25 अर्ज संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आजचा लोकशाही दिन पार  पडला.

आपले सरकार पोर्टलवरील तक्रारीचाही निपटारा वेळेत करा. अनेक विभागांच्या आपले सरकार पोर्टलवर तक्रारी प्रलंबित दाखवत आहेत. प्रत्यक्षात कागदोपत्री तक्रारीचा निपटारा झाला असेल तरी पोर्टलवरही करावा, अशा सूचनाही श्रीमती पवार यांनी केल्या.

यावेळी महसूल शाखेचे तहसीलदार दत्तात्रेय मोहळे, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गोविंद पवार, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हेल्मेट सक्तीबाबत सूचना

सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. तिराणकर यांनी दुचाकी वाहन वापरणारे सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे. याबाबत सर्व कार्यालयात दोन आठवडे प्रबोधन केले जाईल, त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments